नाशिक जिल्हा ४ हजार पाचशेपार

नाशिक जिल्हा ४ हजार पाचशेपार

नाशिक जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) ९२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक ग्रामीण 30, नाशिक शहर 61, मालेगाव 20 आणि जिल्ह्याबाहेरील 4 रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 9 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. यात नाशिक शहर 6 आणि नाशिक ग्रामीणमधील 3 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 4 हजार 545 करोनाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात २ हजार ३७१ रूग्ण आहेत.
नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. मात्र, रूग्णवाढीवर जनता कर्फ्यूचा कोणताच परिणाम झाला नसल्याचे आकडेवाडीवरून दिसून येत आहे. गुरूवारी दिवसभरात 510 संशयित रूग्ण विविध रूग्णालयात दाखल झाले. यामध्ये जिल्हा रूग्णालय 7, नाशिक महापालिका रूग्णालय 318, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 5, मालेगाव रूग्णालय 4 आणि नाशिक ग्रामीण रूग्णालयात 176 रूग्ण दाखल झाले आहेत. जिल्ह्यात आजवर 2 हजार 594 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 562, नाशिक शहर 1112, मालेगाव 836, जिल्ह्याबाहेरील 84 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १ हजार ७०२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात नाशिक ग्रामीण 366, नाशिक शहर 1146, मालेगाव 151 आणि जिल्ह्याबाहेरील 39 रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-4545 (मृत-249)
नाशिक ग्रामीण-978(मृत-50)
नाशिक शहर-2371 (मृत-113)
मालेगाव शहर-1062(मृत-75)
जिल्ह्याबाहेरील-134 (मृत-11)

शहरात ६ बाधितांचा मृत्यू
नाशिक शहरात गुरुवारी ६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. गणेशवाडी, देवी मंदिर येथील ५० वर्षीय पुरुष उपचारार्थ २९ जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काझीपुरा, विठ्ठल मंदिर,जुने नाशिक येथील ६० वर्षीय पुरुष २८ जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा १ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिंडोरी रोड, नाशिक येथील ७४ वर्षीय पुरुष २४ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा १ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंचवटी नाशिक येथील ६५ वर्षीय पुरुष २४ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा १ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. नानावली ,द्वारका येथील ५२ वर्षीय पुरुष २९ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा २ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आनंद नगर, सिडको येथील ६० वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात १५ प्रतिबंधित क्षेत्र, ११ निर्बंधमुक्त
प्रतिबंधित क्षेत्र पुढीलप्रमाणे : पुर्वा इमारत-जगतापमळा-नाशिकरोड, वरदलक्ष्मी अपार्टमेंट-जनकनगरी-कामटवाडे, समर्थ बंगला-चाणक्यनगर-खुटवडनगर, रूक्सार रेसिडेन्सी-खोडेनगर, रॉयल नेस्ट इमारत-जयदीपनगर, केशव अमृत कॉम्प्लेक्स-प्लॉट क्र.२-गजानन चौक-पंचवटी, शिवनेरी रो-हाऊस-अनुसया कॉलनी-खोडेनगर, राधाकृष्ण पार्क-गुंजाळबाबानगर-हिरावाडी, श्री गणेश-दसक-जेलरोड, रिवरराईन नेस्ट-दसक, हरीसागर-फर्नाडिसवाडी, हरीकृष्णा अपार्टमेंट-माऊली चौक-अंबड, घोलप इमारत-विहितगाव, मुरलीधर इमारत-जेलरोड, दत्ता अपार्टमेंट-व्दारका, मुक्ताई बंगला-इंदिरानगर.
निर्बंधमुक्त क्षेत्र पुढीलप्रमाणे : आनंद भक्ती सोसायटी-नाशिकरोड, सत्यम रेसिडेन्सी-अनुसयानगर-तपोवन लिंकरोड, महादेववाडी-सातपूर, कृष्ण मंदिर गल्ली-शिवाजीनगर, सिग्नेचर अपार्टमेंट-सिरीन मेडोज-गंगापूररोड, पाटीलगल्ली-बुधवार पेठ-जुने नाशिक, बी-६-समृद्धी सुंदर रो-हाऊस-विठ्ठलनगर-कामटवाडे, मेहबुबनगर-लेन क्र.४-वडाळागाव, डिवाईन शेल्टर-डॉन बॉस्को-थत्तेनगर, तुलसी हाईट्स-रामकृष्णनगर-मखमलाबाद, शिवनेरी हेरिटेज-जय मल्हारपार्कजवळ-औरंगाबादरोड,

First Published on: July 2, 2020 9:17 PM
Exit mobile version