नाशिकमध्ये ९४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये ९४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, गुरुवारी (दि.२५) दिवसभरात ९४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक ग्रामीण ३१, नाशिक शहर ५२ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहर ४, नाशिक ग्रामीण २ आणि जिल्ह्याबाहेरील एका रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार 306 रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात १ हजार ५८० रूग्ण बाधित आहेत.

नाशिक शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग कॉन्टॅक्ट टेरिंग करत बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्या संशयित रूग्णांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर ते राहत असलेली इमारत नाशिक महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. गुरुवारी दिवसभरात नाशिक शहरात ५२ नवे रूग्ण आढळून आले असून ते सर्व हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. जिल्ह्यात आजवर १ हजार ८५४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण 380, नाशिक शहर 622, मालेगाव 787 आणि जिल्ह्याबाहेरील 65 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात १ हजार २53 पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक ग्रामीण 244, नाशिक शहर 877, मालेगाव 104 आणि जिल्ह्याबाहेरील 28 रूग्णांचा समावेश आहे. गुरुवारी दिवसभरात ५57 संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. यात जिल्हा रूग्णालय 22, नाशिक महापालिका रूग्णालय ४३2, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय 20, मालेगाव रूग्णालय 5, नाशिक ग्रामीण रूग्णालयात ७8 रूग्ण दाखल झाले आहेत. अद्यापपावेतो 638 संशयित रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण 76, नाशिक शहर 294 आणि मालेगावातील 268 रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रूग्ण-३306 (मृत-199)
नाशिक ग्रामीण-660 (मृत-३6)
नाशिक शहर-१580 (मृत-81)
मालेगाव शहर-९62 (मृत-७१)
अन्य-104 (मृत-१1)

शहरात ९ नवीन प्रतिबंधित क्षेत्र, ८ ठिकाणे निर्बंधमुक्त
शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे रूग्ण राहत असलेली इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून
घोषित केली जात आहे. गुरुवारी दिवसभरात ९ नवे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. यात शिवसागर रो-हाऊस-हिरावाडी, बिवीयाना बिल्डींग-पंचवटी, शिंदे मळा-आडगाव, एम.एच.बी. जुनी कॉलनी बिल्डींग 2-सातपुर कॉलनी, उमा अपार्टमेट, कोणार्कनगर, पिंपळगाव रोड-पिंपळगाव खांब, आर्शिवाद रो-हाऊस-हिरावाडी, राधिका अपार्टमेंट, सातपुर कॉलनी या इमारतींचा समावेश आहे. नव्याने रूग्ण आढळून न आल्याने ८ ठिकाणे निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. यात माधव विहार सासायटी-आडगाव, ओमसाई अपार्टमेंट-मखमलाबाद रोड-पंचवटी, सनरिच बंगला-सिडको, रोज हार्मोनी-गंगापुररोड, खडकाळी-शालीमार, पवारवाडी-सुभाषरोड, सुर्वे यांचा बंगला-हिरावाडी निर्बंधमुक्त करण्यात आली आहे.

First Published on: June 25, 2020 9:16 PM
Exit mobile version