नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

पनवेल – सुकापूर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. शुभम राजभर असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा कचऱ्यात सापडलेल्या जीन्ससाठी लोकांची झुंबड, किंमत ९४ लाख रुपये

सुकापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पन्नासहून अधिक धोकादायक इमारती झाल्या आहेत. यातील बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या असून त्यात नागरिक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायतीने इमारत खाली करण्यासाठी नोटीस देखील बजावली आहे. असे असताना देखील नागरिक जीवावर उदार होऊन त्यात राहत आहेत.

हेही वाचा – देशातील 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज; उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता

११ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या नवजीवन सोसायटीच्या दुसऱ्या व पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. यात तळमजल्यावर राहत असलेला शुभम सुरेश राजभर याचा मृत्यू झाला. यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. स्लॅब कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील सुकापूर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुकापूर -पाली देवद येथील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सिडको नैना अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन सुद्धा आणि वारंवार अधिकाऱ्यांसोबत पत्र पत्रव्यवहार करूनसुद्धा आजपर्यंत सिडको नैना प्रशासनाने या बाबतीत कुठलीच भूमिका घेतलेली नाही.

First Published on: December 12, 2022 4:03 PM
Exit mobile version