ठाण्यात बहुमजली इमारतीला भीषण आग

ठाण्यात बहुमजली इमारतीला भीषण आग

ठाण्यात बहुमजली इमारतीला भीषण आग

ठाण्यात एका इमारतीच्या टेरेसवर भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. ठाणे (पश्चिम) येथील नौपाडा भागातील भगवती शाळेजवळच्या सोहम ट्रीपिकल युनिट या २२ मजली इमारतीच्या टेरेसवर ही आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

दरम्यान, ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आग लागलेल्या इमारतीचे बांधकाम चालू होते. त्यामुळे बांधकाम साहित्य टेरेसवर आहे. टेरेसवर उघड्यावर असलेल्या वायर, केमिकल, कास्टिंग प्लेट, प्लास्टिक जळत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमुळे हे साहित्य खाली पडण्याची भीती व्यक्त केली आहे. खबरदारी म्हणून इमारतीच्या आजूबाजूचा परीसर मोकळा करण्यात आला आहे.


हेही वाचा – कोल्हापूर: वेळे अभावी इंदोरीकर महाराज यांचा कार्यक्रम रद्द


 

First Published on: February 28, 2020 4:00 PM
Exit mobile version