धाराशिवमधील मोठ्या बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल

धाराशिवमधील मोठ्या बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल

A multi crore scam at a co operative bank in Dharashiv A case has been filed against the former president

धाराशिव येथील सहकारी बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. 5 कोटी 46 लाख 12 हजार रुपयांचा अपहार व फसवणूक प्रकरणी धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध धाराशिव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( A multi crore scam at a co operative bank in Dharashiv A case has been filed against the former president )

28 सप्टेंबर 2005 ते 31 मार्च 2008 दरम्यान धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन चेरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमत करुन नियमबाह्य पद्धीने बॉण्ड खरेदी केले. हे करताना त्यानी नोएडा टोला ब्रीज कंपनी लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरीत असताना व त्या कंपनीची पडताळणी केली नाही.

तसेच, त्या कंपनीमध्ये मुंबईच्या एसीई गिल्टस ट्रेडींग प्रा.लि. या ब्रोकर कंपनीच्या मार्फत जैन सहकारी बॅंक लि. आणि बेंगळुरुच्या दि टेक्सस्टाईल को. ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड येथील खात्यावरुन एकूण 4 हजार 400 डिप डिस्काऊंट बॉन्ड खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 23 हजार रुपयांप्रमाणे असे जास्तीची रक्कम देऊन नियमबाह्य पद्धतीने बॉन्ड खरेदी केली.

तसचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीचे उल्लंघन करुन 5 कोटी 46 लाख 12 हजार इतक्या धाराशिव जनता सहकारी बँकेतील सभासद व ठेवीदार यांच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली.

( हेही वाचा: कुठे उन्हाच्या झळा तर कुठे बरसणार पाऊस? पुढचे पाच दिवस असं असेल हवामान )

या कारणामुळे धाराशिवस सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध धाराशिव जनता सहकारी बॅंकेचे सभासद प्रविण विष्णुपंत धाबेकर वय, 53 वर्षे,. यांच्याविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 173/2023 भा.द.सं कलम 420,409,34 अन्वये 19 मे 2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे करत आहेत.

First Published on: May 21, 2023 9:12 AM
Exit mobile version