अमरावतीमध्ये युवतीने अपहरणाचा बनाव करत केला प्रेमविवाह

अमरावतीमध्ये युवतीने अपहरणाचा बनाव करत केला प्रेमविवाह

अमरावतीमध्ये युवतीने अपहरणाचा बनाव करत केला प्रेमविवाह

युवतीच्या अपहरणाचा बनाव करत प्रेमविवाह केल्याची आश्चर्यकारक घटना अमरावतीच्या अकोट गावात घडली आहे. या प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीने मोबाईलच्या माध्यमातून अपहरण झाल्याचे मॅसेज घरच्यांना पाठवला होता. या मॅसेजमुळे अकोट, शेगाव पोलिसांसह कुटुंब चिंतेत सापडले होते. पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी पुरा जिल्हा पालथा घातला परंतु तरुणी सापडली नाही. परंतु या अपहरणाचा बनाव करत तरुणीने प्रेमविवाह केल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी व घरच्यांनी सुटकेचा श्वास सोडला.अमरावतीमधील जिल्ह्यातील एका गावात राहणारी २२ वर्षीय युवती शेगावमध्ये आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती, मात्र शेगावातून अकोटमार्गे परत येत असताना आपले अपहरण झाल्याचा बनाव या तरुणीने केला.

या अपहरणाची जबरदस्त स्टोरी बनवत तरुणीने लग्न होईपर्यंत मोबाईलद्वारे कुटुबियांना आणि पोलिसांना अपहरण करणारे कोण आहेत अशी अधिक खोटी माहिती देऊन पोलिसांचे आणि कुटुंबियांचे लक्ष विचलित केले. शेगावपासून एक महिला आपल्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती तरुणीने त्या मॅसेजमधू दिली. त्यामुळे अपहरण अकोटमधून केल्याचे संदेश पाठविल्याने अकोट शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तरुणीचा शोध सुरु केला. शेगाव पोलिसांनीही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करुन घेतली. पोलिसांनी मोबाइल लोकेशन, संदेशाची तपासणी, सायबर क्राइमकडून सीडीआर आदी माहिती गोळा करण्यासाठी शहर पोलिसांनी सुत्र हलवले. त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर तरुणीचे फोटो व्हायरल करत बेपत्ता झाल्याची माहिती देत शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.

याचदरम्यान पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात एका युवतीने अकोटतील एका गावातील २६ वर्षीय युवकासोबत प्रेमविवाह केल्याची माहिती पुढे आली. याचवेळी अकोला-अमरावती-बुलडाणा पोलीस तरुणीचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान करत होते. परंतु पथ्रोटतील आर्यसमाज मंदिरात २६ वर्षीय युवकासोबत प्रेमविवाह करणारी तरुणी हीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.


हेही वाचा- कोरोनामुळे नागपूर विद्यापीठच्या ‘बीएड’ परीक्षा उशीराने

 

First Published on: February 25, 2021 4:45 PM
Exit mobile version