घरमहाराष्ट्रकोरोनामुळे नागपूर विद्यापीठच्या ‘बीएड’ परीक्षा उशीराने

कोरोनामुळे नागपूर विद्यापीठच्या ‘बीएड’ परीक्षा उशीराने

Subscribe

राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बीएडच्या प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा पुन्हा एकदा उशीराने होणार आहेत. नागपूरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे नागपूर जिल्हाप्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे कोरोनामुळे बीएड परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलावी लागली आहे. या २०१९- २०२०च्या परीक्षा हिवाळ्यात पूर्ण व्हायला हव्या होत्या, मात्र अद्याप त्या झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांसमोर या परीक्षेसंदर्भात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्रातील परीक्षा १६ मार्चला होणार होती. मात्र पहिला पेपर होताच राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या. ही परीक्षा हिवाळी २०१९ च्या सत्रातील असल्याने विद्यार्थांना विद्यापीठाकडून साथ प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही शक्य झाले नाही. त्यानंतर ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थी बाहेरगावातील असल्याने नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची? परीक्षेच्या कालावधीत रहायचे कुठे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्यानंतर विद्यापीठाने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यामुळे विद्यापीठानेही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या. गेल्या बुधवारी विद्यार्थ्यांचा ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स’चा पेपर होता. या पेपरसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावरही उपस्थित होते. मात्र कोरोनामुळे परीक्षा केंद्र असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयच सील करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या वाहनाने पाठविण्यात आले. दरम्यान नागपूर पालिके प्रशासनाकडून आदेश आले की, परीक्षा घेतल्यास ‘कोरोना’च्या नियमावलीचा भंग होईल. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -