बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता – अभिजित बिचुकले

बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता – अभिजित बिचुकले

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कथित बंडखोरी केल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यातच, नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले अभिजित बिचुकले यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानाखाली जाळ काढला असता, अश्या शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतले. (Abhijeet bichukale on eknath shinde controversy)

हेही वाचा – ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, लवकरच शपथविधी

अभिजित बिचुकले आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायला गेले होते. यावेळी त्यांनी राजकारणातील घडामोडींबाबत भाष्य केलं.

अभिजित बिचुकले म्हणाले की, ‘यांची नाटकं सुरु आहेत. संपूर्ण जनतेला यांनी वेठीस धरलेलं आहे. कोणत्या माणसाला निवडून द्यायचं हे जनतेनं आता शिकायला हवं. यासाठी लोकांना अभिजीत बिचुकले हा पर्याय आहे. मी सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. कर्म करा, असं ईश्वरानं सांगितलं. मी राष्ट्रपती, पंतप्रधान होण्यासाठी धडपड करत आहे. माऊली मला एक दिवस राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनवतील. ‘

हेही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा : रामदास आठवले

त्यानंतर बिचुकले म्हणाले की, ‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता.’ त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधलं.

दरम्यान, मराठवाडा, कोकण, ठाण्यातील किमान 30 हून अधिक आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर ते गुजरातमधील सूरतमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती मिळालीय. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर शिवसेनेच्या पायाखालची जमीनच सरकलीय. शिवसेनेनं तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवून शिवसेनेचे आमदार अजय चौधरींना ते बहाल केलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्यात जमा असल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: June 21, 2022 7:35 PM
Exit mobile version