नोव्हेंबरपासून कॉलेज होणार सुरु; बैठकीत घेण्यात आला निर्णय

नोव्हेंबरपासून कॉलेज होणार सुरु; बैठकीत घेण्यात आला निर्णय

College Reopen : 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालय पुन्हा सुरु ; दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष येत्या नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि युजीसीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समोर आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, जेईई – नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.

अशी पार पडली बैठक

मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि युजीसीची बैठक मंगळवारी रात्री घेण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरु कराव, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ओपन बुक परिक्षा

दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा घेतली जाणार असून १५ ऑगस्टपर्यंत ही परीक्षा होणार आहे. तसेच विद्यापीठामध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतला जाणार असून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निर्णय लागण्याचीही शक्यता आहे.

सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नाही

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या सख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती पाहून सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं शक्य नसल्याचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना कळवले आहे.


हेही वाचा – खासदार छत्रपती संभाजी राजे तिसऱ्या रांगेत, मंत्रालयातल्या बैठकीत गोंधळ!


First Published on: July 9, 2020 11:42 AM
Exit mobile version