कोश्यारींचा राजीनामा स्वीकारणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण; संभाजीराजेंचा हल्लाबोल

कोश्यारींचा राजीनामा स्वीकारणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण; संभाजीराजेंचा हल्लाबोल

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण आहे’, अशा शब्दांत भगतसिंह कोश्यारींच्या राजीनाम्यावर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी टीका केली. तसेच, ‘नव्या राज्यपालांनी महाराष्ट्राची परंपरा राज्यबाहेर नेण्याची त्यांची जबाबदारी आहे. नव्या राज्यपालांनी योग्य पद्धतीने आपले कार्य करावे’, असेही त्यानी सांगितले. (Accepting Bhagat Singh Koshyari resignation was a belated wisdom Sambhaji Raje Chhatrapati)

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मागील दोन महिन्यांपूर्वीच घ्यायला पाहिजे होता. मागील काही काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. ज्या महाराष्ट्रात सुसंस्कृत पणाची ओळख आहे. त्या महाराष्ट्रात गदारोळ झाला. राज्यपालांनी या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत पणाची घडी मोडली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण आहे”, असे संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले.

“नव्या राज्यपालांना आमच्याकडून शुभेच्छा. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. महाराष्ट्राला वेगळा इतिहास आहे. महाराष्ट्राने महापुरूष आणि नेते घडवले आहेत. महापुरुषांच्या आदर्शाने महाराष्ट्राचा कारभार चालतो. तसेच, राज्यपाल हे पद घटनात्मक आणि सन्मानपूर्वक पद आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनता राज्यपालांकडे एक आदर्श म्हणून पाहत असतात. त्यामुळे जून्या राज्यपालांकडून ज्या चुका झाल्या आहेत, त्या चूका लक्षात ठेवाव्यात. तसेच, नव्या राज्यपालांनी महाराष्ट्राची परंपरा राज्यबाहेर नेण्याची त्यांची जबाबदारी आहे. नव्या राज्यपालांनी योग्य पद्धतीने आपले कार्य करावे”, असेही संभाजी राजे छत्रपती म्हणाले.

“भगतसिंह कोश्यारींचा आता राजीनामा स्विकारणे म्हणजे, उशीरा सुचलेले शहाणपण आहे. कारण ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना तुम्ही चुकत असल्याचे सांगितले. त्यावेळी ग्रामीण भागातील एकुण-एका नागरिकाने या माणसाला बाहेर काढण्यास सांगितले. असे असताना दीड महिने का वाट पाहिली. महाराष्ट्रात गदारोळ किती झाला. महाराष्ट्रातील कोणता व्यक्ती सांगत होता की, त्यांना राज्यपाल म्हणून राहुदे. कोणी नाही सांगितलं”, अशा शब्दांत संभाजी राजे छत्रपती यांनी टीका केली.

स्वराज्य मागे-पुढे न बघता ठोकल्याशिवाय राहणार नाही

“नव्या राज्यपालांनी योग्य पद्धतीने काम करावे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी अत्यंत छान काम केले. डॉ. पी. सी. अलेक्झांडर हे सुसंस्कृत होते. त्यांच्यासारखे सर्वांना काम करावे. आम्ही त्यांच्यासोबत राहू. पण आता स्वराज्यात आमची वेगळीच ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा काय अशी वाश्चाता झाली. तर स्वराज्य मागे-पुढे न बघता ठोकल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही यावेळी स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी दिला.


हेही वाचा – दिल्लीत महापौर, उपमहापौरपदाची १६ फेब्रुवारीला होणार निवडणूक

First Published on: February 12, 2023 12:32 PM
Exit mobile version