घरदेश-विदेशदिल्लीत महापौर, उपमहापौरपदाची १६ फेब्रुवारीला होणार निवडणूक

दिल्लीत महापौर, उपमहापौरपदाची १६ फेब्रुवारीला होणार निवडणूक

Subscribe

MCD Election | महापौर निवडणूक जलद गतीने घेण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायने नायब राज्यपाल, एमसीडीचे पीठासीन अधिकारी आणि अन्य लोकांकडून उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आता १६ फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MCD Mayor Election |नवी दिल्ली – दिल्ली महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे सदस्य पदाच्या निवडणुका १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के.सक्सेना या निवडणुकांच्या प्रत्सावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत गोंधळ सुरू आहे. आतापर्यंत अनेकवेळा सभागृहाचं कामकाजही स्थगित करण्यात आलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल वी.के.सक्सेना यांच्याकडे निवडणुकांसाठी प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी महापौर निवडणूक ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, एमसीडीशी संबंधित एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून १३ फेब्रुवारीला सुनावणी आहे. त्यामुळे निवडणूक १६ फेब्रुवारीला होतील, असं वी.के.सक्सेना यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

महापौर निवडणूक जलद गतीने घेण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायने नायब राज्यपाल, एमसीडीचे पीठासीन अधिकारी आणि अन्य लोकांकडून उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आता १६ फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – दिल्ली महापौरांची निवडणूक तिसऱ्यांदा रखडली, गदारोळामुळे कामकाज स्थगित

- Advertisement -

दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला होणार होती. तिसऱ्यांदा ही निवडणूक लागली होती. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरू होताच गदारोळ झाला. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज आधी 10 मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र, गदारोळ सुरूच राहिल्याने त्यांनी सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब केले. अशाप्रकारे दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने (AAP) सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.

६ फेब्रुवारी रोजी सभागृहाची बैठक सुरू होण्यापूर्वीच आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. पीठासीन अधिकाऱ्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे, यासाठी भाजपाने आपल्या नगरसेवकांना सभागृहात गोंधळ घालण्यास सांगितले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला. तर दुसरीकडे, भाजपाने पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीवर आपले नगरसेवक खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांना मतदान करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आमच्या 10 नगरसेवकांशी संपर्क साधला आणि त्यांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा दावा भाजपाने केला. भाजपच्या नेत्यांनी आपले सर्व 10 नगरसेवक प्रसार माध्यमांसमोर हजर केले.

नामनिर्देशित सदस्यांना मतदान करण्याला आपचा आक्षेप

नायब राज्यपालांनी नामनिर्देशित केलेले सदस्यही महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात, असे सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सदस्य भाजपाच्या पारड्यात मते टाकतील, असा दावा करत आपच्या नगरसेवकांनी विरोध सुरू केला आणि सभागृहात गोंधळ सुरू झाला.
आपच्या ज्या दोन नेत्यांविरोधात खटला सुरू आहे, त्यांना मतदान करू देऊ नये, अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी केली. त्यावरून भाजपा नगरसेवकांनीही गदारोळ केला. अशा प्रकारे सभागृहात शांतता प्रस्थापित होत नसल्याचे पाहून पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -