नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही; कशेडी घाटात सोमय्या-पोलीस आमनेसामने

नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही; कशेडी घाटात सोमय्या-पोलीस आमनेसामने

लोकवर्गणीतून जमा झालेला पैशांचा भारतीय सैनिकांच्या कल्याणासाठी उपयोग करा, राष्ट्रवादीची मागणी

मुंबईः नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही, उद्धव ठाकरेंचे पोलीस उद्धट आहेत, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याच्या उद्देशाने भाजपचे नेते किरीट सोमय्या आता दापोलीकडे रवाना झालेत.

‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ असा नारा देत किरीट सोमय्या दापोलीकडे जात असतानाच पोलिसांनी त्यांना कशेडी घाटात अडवले. त्यावेळी काही किरीट सोमय्या आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे तेरी दादागिरी नही चलेगी म्हणत जोरदार घोषणबाजीही केली. विशेष म्हणजे पोलिसांनी या सर्व प्रकारावर बोलण्यास नकार दिला.

किरीट सोमय्या हाती प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना झाले असून, खेडे ते दापोलीला १०० गाड्यांचा ताफा निघालाय. काल शिवसेनेचे नेते संजय कदम यांनी सोमय्यांना दापोलीत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागमधील कोर्लईमध्ये झालेला शिवसेना-भाजप संघर्ष दापोलीत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दापोलीकडे रवाना होण्यापूर्वी किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी सोमय्या म्हणाले होते की, ‘ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे समोर आणणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा.’

‘अनिल परबांना मंत्रिमंडळातून काढावं लागणार’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारमध्ये जे घोटाळेबाज, अनधिकृत बांधकाम, वसूलीचा पैसा, ५ स्टार रिसॉर्ट, ५ स्टार बंगले बांधण्याचे काम करतायत, त्याच्यावर करावाई करण्याचा हा प्रतिकात्मक हातोडा आहे. या घोटाळेबाज सरकारचा जनता असाच हातोडा घेऊन सत्यानाश, विनाश करणार आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा आहे. जनतेची ताकद, शक्ती ठाकरे सरकारला दाखवायला चाललो आहे. महात्मा गांधींही मीठ सत्याग्रह करायला केला होता. तर हा सुद्धा एक सत्याग्रह आहे. महाराष्ट्राच्या साडेबारा कोटींच्या सत्यासाठीचा सत्याग्रह आहे. या अनिल परब यांना आज नाही तर उद्या मंत्रिमंडळातून काढावाच लागणार आहे,’ असे किरीट सोमय्या म्हणाले होते.


हेही वाचा – मुंबै बँक बोगस मजूर प्रकरण! प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

First Published on: March 26, 2022 3:36 PM
Exit mobile version