भरधाव लक्झरी बसची ट्रकला धडक, २ ठार

भरधाव लक्झरी बसची ट्रकला धडक, २ ठार

प्रातिनिधिक फोटो

आज पहाटे सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. शुक्रवारी (आज) पहाटेच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहराच्या शिवारात ही दुर्घटना घडली. भरधाव वेगातील एका लक्झरी बसने माल ट्रकला पाठीमागून जोरजदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामध्ये बसमधील दोघे जण जागीच ठार झाले. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून, अनिता पवार (३२, रा. कर्नाटक) आणि तारानाथ पवार (२८, रा. कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. तर, अशोक पवार (रा. कर्नाटक) असं अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.


वाचा: रोहित शर्माने मागितली पत्नीची माफी, कारण…

घटना सविस्तर…

बंडू बिनगे (रा. माढा) हे आपला कांद्याने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच २५ यु २३१५) घेवून, सोलापूर पुणे महामार्गावरुन बंगळुरूकडे निघाले होते. पहाटे सव्वातीन वाजता ते मोहोळ येथील शेतकी फार्म जवळ असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या लक्झरी बसने (केए ३२ सी ८४०८) चालत्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बस मधील दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवून दिले. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.

First Published on: December 21, 2018 9:49 PM
Exit mobile version