Priya Singhची चित्तरकथा: हॉटेलमध्ये बोलावलं, रेंज रोव्हरने उडवलं..; “अश्वजीतचे मित्र हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या बहिणीला…”

Priya Singhची चित्तरकथा: हॉटेलमध्ये बोलावलं, रेंज रोव्हरने उडवलं..; “अश्वजीतचे मित्र हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या बहिणीला…”

अश्वजीत गायकवाडचे मित्र माझ्या बहिणीला धमकावत आहेत

मुंबई – महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) अनिल कुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत गायकवाड (Ashwajit Gaikwad) याच्यावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने गंभीर आरोप केले आहेत. अश्वजीतने त्याची प्रेयसी तसेच इन्स्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर प्रिया सिंहला कार खाली चिरडण्याचा प्रयत्न केलाय. अश्वजीत गायकवाड भारतीय जनता पक्षाच्या (BJP) युवा मोर्चाचा (Bharatiya Janata Yuva Morcha) अध्यक्ष आहे. पोलिसांनी प्रिया सिंहवरील जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. प्रिया सिंह इन्फिनिटी मेडीसर्च सेंटरमध्ये दाखल असून तिच्यावर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कथा तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

प्रिया सिंहने लिहिले आहे, माझा डावा पाय मोडला असून सर्जरी करण्यात आली आहे. पायामध्ये रॉड टाकण्यात आले आहेत. माझ्या संपूर्ण शरीरावर मारल्याच्या खुना आहे. माझा खांदा, हात आणि पाठीवर गंभीर जखमा आहेत. मला कमीत कमी 3-4 महिने बेडवरच राहावे लागणार आहे. त्यानंतरही सहा महिने चालता फिरता येणार नाही. त्यासाठी आधार घ्यावा लागणार आहे. घरामध्ये मीच एकमेव कमावती आहे. माझ्यावरच संपूर्ण कुटुंबाचा भार आहे. आता मी काम नाही करु शकत.

प्रियाने पुढे लिहिले आहे, की मी त्याला (अश्वजीत) चार-पाच वर्षांपासून डेट करत होते. तो मला भेटायला आला नाही. त्याच्यापासून मला धोका आहे. त्याचे काही मित्र दोन दिवसांपासून सतत हॉस्पिटलमध्ये येत आहेत. माझ्या बहिणीला धमाकावत आहे, कारण मी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मी प्रचंड दहशतीखाली आणि घाबरलेली आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबासोबत काहीही अघटीत घडू शकतं, या दहशतीखाली मी आहे.
प्रिया सिंह सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच स्थितीमध्ये आपल्यावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.

प्रिया सिंह तिच्या पोस्टमध्ये म्हणते, मला माहित नाही, माझे आयुष्य परत कधी पहिल्यासारखे नॉर्मल होईल. माझ्यासाठी प्रार्थना करा. मला फक्त न्यायाची आपेक्षा आहे. मी हॉस्पिटलमध्ये असून मला असह्य वेदना होत आहेत. मी स्वतःहून काहीच करु शकत नाही, बेडवर देखील मला हलता येत नाही. माझ्या पायात भयंकर वेदना होत आहेत. शरीराच्या अनेक भागात सतत दुखत आहे.

चार वाजता मला कॉल आला आणि मी भेटायला गेले

प्रिया तिच्या पोस्टमध्ये लिहिते, सोमवारी सकाळी चार वाजता मला अश्वजीत गायकवाडचा फोन आला, त्यानंतर मी त्याला भेटायला गेले. तिथे जाऊन पाहाते तर अश्वजीत त्याच्या कुटुंब आणि आमच्या काही कॉमन मित्रांसोबत पार्टी करत होता. तिथे गेल्यानंतर मी काही मित्रांना भेटली. तेव्हा माझा बॉयफ्रेंड अश्वजीतचा माझ्यासोबतचा व्यवहार हा थोडा विचित्र वाटला. तो नेहमीप्रमाणे वागतो तसा त्या दिवशी नव्हता. त्यामुळे मी त्याला विचारले काय झालंय, सगळं ठीक आहे ना? मी त्याला एकांतात बोलण्याचा आग्रह केला आणि तिथून बाहेर येऊन त्याची वाट पाहात थांबले.

“तो मित्रांसोबत बाहेर आला आणि माझ्यावर हल्ला केला”

प्रिया सिंह तिच्या पोस्टमध्ये लिहिते, तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर आला. मी अश्वजीतसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा मित्र रोमिल पाटील याने मला अडवलं. तो माझ्यासोबत वाईट वागायला लागला. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. माझा बॉयफ्रेंड आणि त्याचे मित्र मला शिवीगाळ करु लागले. मी त्यांना हे सर्व बंद करा म्हटलं तर अश्वजीतने माझ्या कानशीलात लगावली. माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मी त्याला माझ्यापासून दूर लोटण्याचाही प्रयत्न केला. मला मारहाण सुरु झाली. माझे केस पकडून ओढत, खाली पाडत मला लाथा बुक्क्यांनी मारू लागले.

प्रिया सिंह लिहिते, मी खाले पडले. मला काही समजण्याच्या आधीच ते सर्वजण त्यांच्या कारकडे जात होते. त्याच दरम्यान मी माझा फोन आणि बॅग घेण्यासाठी अश्वजीतच्या कारकडे धावले. भांडणा दरम्यान त्याने माझे सामान हिसाकावून घेतले होते आणि त्याच्या कारमध्ये टाकले होते. मी त्याच्या रेंज रोव्हर डिफेंडर कार जवळ पोहचले तेव्हा ऐकले की तो त्याच्या ड्रायव्हर सागरला सांगतोय की ‘हिला उडवून दे..’

“अश्वजीतच्या सांगण्यावरुन ड्रायव्हरने मला कारने उडवलं”

प्रियाने म्हटलं की अश्वजीत गायकवाडच्या सांगण्यावरुन ड्रायव्हरने कारचा वेग वाढवून मला जोरदार धडक दिली. मी जमिनीवर पडले. कारचे डाव्या बाजूचे चाक माझ्या उजव्या पायावरुन गेले. 20-30 मीटर पुढे गेल्यानतंर ते थांबले. मी वेदनेने विव्हळत होते, मदतीची याचना करत होते. मात्र ते तिथून पळून गेले. मी रस्त्यावर जवळपास 30 मिनिट तिथेच कोणत्याही मदतीशिवाय, फोनशिवाय पडून होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या एकाने मला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. त्या व्यक्तीने मला मदत केली.

“काही वेळाने ड्रायव्हर पाहायला आला मी मेले की जिवंत आहे?”

काही वेळाने अश्वजीतचा ड्रायव्हर पाहायला आला की मी मेले की जिवंत आहे? ड्रायव्हरने मला मदत करणाऱ्या व्यक्तीला पाहिले आणि पोलिसांपासून आपली सुटका व्हावी या उद्देशाने मला हॉस्पिटलला घेऊन जाण्याविषयी त्याला बोलला. हॉस्पिटलला जात असताना ड्रायव्हरने मला धमकी दिली की पोलिसात तक्रार करायची नाही. भाऊ (अश्वजीत) कोणासोबत आहे हे तुला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे तू काहीही करु शकणार नाही, आणि सर्व आरोप मी माझ्यावर घेईल. त्यामुळे तू काहीही करु शकणार नाहीस. हॉस्पिटलला पोहचल्यानंतर मी माझ्या कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी अनेकदा फोन मागितला. डॉक्टरांनी कडक शब्दात सुनावल्यानंतर माझ्या बहिणीला फोन करण्यात आला.


या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत यासंबंधी जाब विचारणार असल्याचे म्हटले आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या संबंधी केलेल्या ट्विटवरुनही आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

हेही वाचा : Ambadas Danve : ठाण्यातील पीडितेला न्याय मिळवूनच देऊ; ठाकरे गटाची भूमिका

First Published on: December 17, 2023 7:13 PM
Exit mobile version