घरठाणेAmbadas Danve : ठाण्यातील पीडितेला न्याय मिळवूनच देऊ; ठाकरे गटाची भूमिका

Ambadas Danve : ठाण्यातील पीडितेला न्याय मिळवूनच देऊ; ठाकरे गटाची भूमिका

Subscribe

पीडितेच्या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले की, पीडितेची आज भेट घेतली. महिला पोलीस अधिकारी यावेळी सोबत होत्या. घटनेच्या तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आलेला आहे.

ठाणे : एका तरुणांनी त्याची मैत्रिण असलेल्या एका तरुणीवर कार चालवून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील पीडिता रुग्णालयात असून, आज रविवारी (17 डिसेंबर) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतील असून, पीडितेला न्याय मिळवूनच देऊ असे त्यांनी वक्तव्य यावेळी केली. (Ambadas Danve Lets get justice for the victim in Thane The role of the Thackeray group)

पीडितेच्या भेटीनंतर अंबादास दानवे म्हणाले की, पीडितेची आज भेट घेतली. महिला पोलीस अधिकारी यावेळी सोबत होत्या. घटनेच्या तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आलेला आहे. या घटनेमधील जो आरोपी मुलगा आहे त्याने जाणीवपूर्वक तरुणीला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे. तो चुकीचा आहे. तर याच प्रकरणात लक्षं दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या पद्धतीने आरोपी गायकवाड आणि त्याच्या सहकाऱ्यानी केलेला गुन्हा हा गंभीर असून, गायकवाडच्या ठिकाणी आतापर्यंत दुसरं कुणी असतं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असती. परंतू अजूनही गायकवाड याला अटक करण्यात आला नाही. तर पीडितेवर दबाव आणला जातोय. पण कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. तेव्हा ज्याप्रकारे वैद्यकीय अहवाल आलेला आहे त्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी दानवे यांनी पोलिसांकडे केली. तर सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून, अधिवेशनात हा विषय उचलून लावू आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असेही ते यावेळी म्हणाले. तर पीडितेची मागणी ही फक्त एवढीच आहे की, त्या आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा परंतू तसे केले जात नसल्याचीही माहिती दानवे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटीलच्या “या” गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा

हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन राजकारण पेटणार

सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, राज्यातील विविध प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच एवढी मोठी घटना घडल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जाऊ शकतो. तेव्हा सोमवारी अधिवेशनात काय घडते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -