लहान मुलांच्या भांडणावरुन झाला acid हल्ला; ६ जण गंभीर जखमी

लहान मुलांच्या भांडणावरुन झाला acid हल्ला; ६ जण गंभीर जखमी

लहान मुलांच्या भांडणावरुन झाला acid हल्ला; ६ जण गंभीर जखमी

शेजारी म्हटलं की राग रूसवे फुगवे आलेच. शेजाऱ्यांसोबत भांडणाच्या अनेक घटना रोज घडत असतात. कल्याणमध्ये राहणाऱ्या अशाच एका शेजाऱ्यांनी मात्र भांडणाचं टोक गाठलं. त्याच्यात हाणामारी झाली. हे भांडण इतक्या शिगेला पोहचलं की, तिथे acid हल्ला करण्यात आला. या acid हल्ल्यात ६ जण गंभीररित्या भाजले आहेत. कल्याण पूर्व मधील नेतिवली परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नेतिवली परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कल्याण पूर्वे येथे नेतिवली परिसरात अबीद अन्सारी आणि रिंकू मंडल हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका घरावरून वाद सुरु होता. बुधवारी त्यांची लहान मुले घराच्या दारात खेळत होती. मुलांमध्ये खेळता खेळता काही कारणांवरून वाद झाला. या वादात दोन्ही शेजाऱ्यांनी उडी घेतली. त्यांच्यातला वाद वाढत गेला. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही घरांमध्ये हाणामारी सुरू झाली. या हाणामारीचा फायदा घेऊन तिथे acid हल्ला करण्यात आला. या acid हल्यात ६ जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींवर कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार सुरू आहेत.यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

शेजाऱ्यामध्ये झालेल्या भांडणात हा acid नक्की कोणी केला हे अद्याप कळू शकले नाहीय. पोलिस या याबाबत चौकशी करत आहेत. त्याचप्रमाणे acid कोणी आणि कशासाठी आणलं याचा तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत.


हेही वाचा – खासगी बसचालकांना चाप; दिवाळीत जादा भाडे आकारल्यास कारवाई! इथे करा तक्रार!

First Published on: November 5, 2020 9:24 PM
Exit mobile version