महापालिका निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

महापालिका निवडणूकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार ? आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर अनेक दिवसांनंतर सगळे पदाधिकारी खूप दिवसांनंतर एकत्र आले. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेणे शक्य होत नव्हते. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या केसेस कमी झाल्या. आता पुन्हा ओमिक्रॉनचे संकट डोक वर काढत आहे. पण पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र होऊन संवाद साधला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पदाधिकारी लसीकरणाच्या कामात अग्रेसर राहिले आहेत. अशावेळी पदाधिकाऱ्यांचे कामाचे कौतुक करणे आणि त्यांच्या सूचना आणि संकल्पना एकून घेण्यासाठीचा हा संवाद होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूकांबाबत महाविकास आघाडी एकत्र लढणार का ? या प्रश्नावर भाष्य केले.

शिवसेनेचे जे काही असते उघड असते. त्यामुळे कानमंत्र वगैरे काही नव्हता. लवकरच राज्यात महापालिका निवडणूका होतील असे अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा विकास करण्याच्या अनुषंगानेच महाविकास आघाडी गेल्या दोन वर्षांमध्ये एकत्रितपणे काम करते आहे. कोविडचा काळ असो किंवा त्यानंतरचा कालावधी असो विकास कामे कुठेही थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री म्हणून आम्ही एकत्रच काम करतो आहोत. कोविडचा काळ पाहता महापालिकेच्या निवडणूका लवकरच लागतील ही अपेक्षा आहे. त्याचवेळी मानस तर असाच आहे की सर्वांनी एकत्र लढावे. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम हे एकत्र व्हावे, असाही मानस त्यांनी मांडला.

नाताळ असेल किंवा नवीन वर्ष असेल त्यामुळेच सर्वांच्या घरी सेलिब्रेशन वातावरण असेल. पण त्याचवेळी गर्दी न करणे, लसीकरण पूर्ण केले असणे गरजेचे आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतानाच मास्कचा वापर करणेही गरजेचे आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले. याआधीच उपमुख्यमंत्र्यांनीही कोरोना निर्बंधांबाबत सविस्तर माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.


Maharashtra Lockdown : ओमिक्रॉनची सेंच्युरी ! लॉकडाऊन कधी ? आरोग्यमंत्री म्हणतात…

First Published on: December 25, 2021 4:27 PM
Exit mobile version