विद्यार्थ्यांना फायनान्स लिट्रसीचे धडे दिले जाणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

विद्यार्थ्यांना फायनान्स लिट्रसीचे धडे दिले जाणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती

मुंबई महापालिकेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना फायनान्स लिट्रसीवर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. जूनपासून याची सुरूवात होणार आहे. आज जसं मुंबईत झालं तशी माझी इच्छा आहे की, आपल्या इतर शहरांमध्ये देखील महापालिकेच्या शाळांमध्ये आणि राज्य शासनाच्या शाळांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील सुरू व्हावं, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

फायनान्स लिट्रसीवर सध्याच्या परिस्थितीत कुणीही बोलायला मागत नाही. गुंतवणूक, बँकेच्या संबंधीतील कामं किंवा पैशाचं जतन कसे करावे. तसेच म्युच्युअल फंड या संबंधीत गोष्टी विद्यार्थ्यांना समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पुढची पिढी घडवण्यासाठी पैशाचं जतन कसं करावं, यासंबंधीत धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान आत्मसात करता येईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

राज्यात आणि देशात बीएसईची संस्था १४७ वर्ष कार्यारत आहे. तीन वर्षानंतर बीएसईला १५० वर्ष पूर्ण होतील. तसेच तीन वर्षानंतरची पहिली बॅच १८ वर्षांची होईल. त्यामुळे या बॅचने फायनान्स लिट्रसीचे धडे घेऊन गुंतवणूक करावी. कारण गुंतवणूक केल्यानंतर स्वयंरोजगार, रोजगार आणि आत्मनिर्भर झाल्यानंतर स्वत: आर्थिक परिस्थिती कशी हाताळायची हे त्यांना समजेल. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन अभ्यासक्रम घेऊन येत आहोत. तसेच सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टॉक एक्स्चेन्ज नावाचा अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे, असं ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : Ram Navami 2022: रामनवमीच्या मिरवणुकीत चार राज्यात हिंसाचाराच्या घटना, गुजरातमध्ये एकाचा मृत्यू


 

First Published on: April 11, 2022 2:08 PM
Exit mobile version