घरताज्या घडामोडीRam Navami 2022: रामनवमीच्या मिरवणुकीत चार राज्यात हिंसाचाराच्या घटना, गुजरातमध्ये एकाचा...

Ram Navami 2022: रामनवमीच्या मिरवणुकीत चार राज्यात हिंसाचाराच्या घटना, गुजरातमध्ये एकाचा मृत्यू

Subscribe

रामनवमीच्या दिवशी मिरवणुकीत मोठा हिंसाचार झाला. रामनवमीच्या मिरवणुकीत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या संघर्षामुळे मध्य प्रदेशमध्येही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला कर्फ्यू लावावा लागला. यावेळी लोकांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. अनेक दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील खंभात आणि साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथे जातीय संघर्ष झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंभात येथे एका अज्ञात ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घटनास्थळी सापडला आहे. मात्र या व्यक्तिची अजूनही ओळख पटलेली नाहीये, असे पोलीस अधीक्षक अजित राजन यांनी सांगितले.

- Advertisement -

दुपारी साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरातील छपरिया भागात रामनवमीची मिरवणूक निघाली तेव्हा दोन समुदायातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एसपी विशाल वाघेला म्हणाले की, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या तीन तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल.

प्रभू रामाचा जन्मदिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. तसेच बांकुरा येथील रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. ती राजकीय पद्धतीने करण्यात आली होती. त्यांनी माझ्या गाडीवरही दगडफेक केली, असं केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री ११.३० वाजता गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, जलद कृती दल आणि राज्य राखीव पोलीस दल सकाळी हिम्मतनगरला पोहोचलं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

झारखंडमध्ये जाळपोळ

रामनवमीनिमित्त झारखंडमधील लोहरदगा येथील हिराही-हेंडलासो-कुजरा गावाच्या सीमेवर सुरू असलेल्या जत्रेत हिंसाचार आणि जाळपोळ झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे. एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली, त्यानंतर जत्रेत पोहोचल्यानंतर सुमारे १० मोटारसायकल आणि पिकअप व्हॅनला आग लावण्यात आली.

पश्चिम बंगालमध्ये मिरवणुकीवर हल्ला

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पश्चिम बंगालमधील दक्षिण हावडा येथील बीई कॉलेजजवळून विश्व हिंदू परिषदेतर्फे मिरवणूक काढण्यात आली, जी हावडा रामकृष्णपूर घाटाकडे जात होती. परंतु हावडा येथील शिवपूर पोलीस ठाण्यांतर्गत पीएम बस्ती परिसरात काही लोकांनी या मिरवणुकीवर अचानक हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.


हेही वाचा : चला..तिकिटा बुक करूक व्हयी! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे तिकिटांचे बुकिंग एप्रिलच्या कोणत्या तारखेपासून सुरू ? वाचा सविस्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -