Aaditya Thackeray Aurangabad Tour: गर्दी झाली तर बाबांचा फोन येईल, कार्यकर्त्यांच्या गर्दीत आदित्य ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

Aaditya Thackeray Aurangabad Tour: गर्दी झाली तर बाबांचा फोन येईल, कार्यकर्त्यांच्या गर्दीत आदित्य ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काल(गुरूवार) औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांचं सिल्लोड तालुक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. या गर्दीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, खूप दिवसानंतर मी बाहेर पडलो. लोकांना बघून आनंद झाला. मात्र, ही गर्दी बघून माझा बाबांचा मला फोन येईल, अशा प्रकारची मिश्किल प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या गर्दीत दिली आहे.

 गर्दी झाली तर बाबांचा फोन येईल

सिल्लोडमध्ये उत्सफुर्त प्रतिसाद होता. अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि खूप आनंद झाला. अनेकजण भेट घेण्यासाठी उत्सुक होते. कोरोना संकटानंतर तब्बल दीड वर्षांनी अशी गर्दी बघायला मिळतेय. मात्र, गर्दी झाल्यानंतर माझे वडील मुख्यमंत्र्यांचा मला फोन येईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमांच्या बाबतीत खूप काटेकोर आहेत. त्यामुळे नियम पाळलेच पाहीजेत, अशी त्यांची भूमिका आहे.

ज्या ठिकाणी कोरोना वाढतोय. त्या ठिकाणी गर्दी टाळली पाहीजे. कारण जेव्हा मी फिरत असतो तेव्हा काळजी घेऊन फिरत असतो. पण चौकात जंगी स्वागत होत असल्याचं कारण मी अब्दुल सत्तार यांच्याकडे ढकलेल, अशी मिश्किल टिप्पणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात प्रत्येक पावलावर इतिहास आहे. परंतु जिल्ह्यामध्ये अजून चांगला विकास कसा करता येईल, तो जगासमोर चांगल्याप्रकारे कसा आणता येईल, त्यासाठी प्रयत्न असेल. मला मंत्री म्हणून पाहण्याचं स्वभाग्य मिळालं आणि थोडं काम केलं तर स्थानिकांना नोकरी मिळू शकते, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील आदित्य ठाकरे आज(शुक्रवार) नाशिक दौऱ्यावर आहेत. पुलाच्या कामामुळे शेकडो वृक्षांची तोड होणार आहे. त्यामुळे त्यांना या परिसराची पाहणी करण्याचा आग्रह धरला गेला. उंटवाडीतील वटवृक्षासह परिसराची पाहणी करणार आदित्य ठाकरे करणार आहेत.


हेही वाचा : Shami On Captaincy: कसोटी कर्णधारपदाच्या मुद्द्यावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य, म्हणाला…


 

First Published on: January 28, 2022 9:46 AM
Exit mobile version