gunaratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

gunaratna sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

संग्रहित छायाचित्र

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणातून वकील गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मराठा समाज व मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंविरोधात कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी सदावर्तेविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने सदावर्तेंना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर सदावर्तेंनी जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयात अर्ज दाखल केला.

आज सदावर्तेंची पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांना कसबा बावडा येथील न्यायालयात हजर करण्यात आले, यावेळी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. आता सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूरात दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्तेंनी मीडियाला मुलाखत दिली होती, या मुलाखतीत सदावर्तेंनी मराठा व मागासवर्गीय समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होते, या वक्तव्याप्रकरणी सकल मराठी क्रांती मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल केला. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं; अभिनेता प्रतीक गांधीने शेअर केला मुंबई पोलिसांचा वाईट अनुभव

First Published on: April 25, 2022 1:03 PM
Exit mobile version