घरमनोरंजनपोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं; अभिनेता प्रतीक गांधीने शेअर केला मुंबई पोलिसांचा...

पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं; अभिनेता प्रतीक गांधीने शेअर केला मुंबई पोलिसांचा वाईट अनुभव

Subscribe

स्कॅम 1992 वेबसीरिज फेम अभिनेता प्रतीक गांधीची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. परंतु रविवारी त्याच्यासोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे तो मुंबई पोलिसांवर नाराज झाला आहे. प्रतीक गांधीने रविवारी मुंबई पोलिसांसोबतचा एक वाईट अनुभव ट्विट केला आहे. त्याच्या या ट्वीटची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

प्रतीकने या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे आरोप केला आहे. महामार्गावर व्हीआयपी मुव्हमेंटदरम्यान रस्त्यावरून पायी जात असताना मुंबई पोलिसांनी अभिनेत्याशी गैरवर्तन करुन त्याचा अपमान केला. अस ट्विट त्याने केलं आहे.

- Advertisement -

प्रतीकने ट्विटमध्ये नेमक काय म्हटलय?

व्हीआयपी मुव्हमेंटमुळे मुंबईचा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जाम होता. म्हणून शूटिंगच्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी मी रस्त्यावरून पायी चालत निघालो. यावेळी पोलिसांनी मला खांद्याला धरून एका मार्बलच्या गोदामात मला अक्षरश: ढकललं. तेव्हापर्यंत त्यांनी मला काहीच सांगितलं नाही आणि माझा अपमान केला. असं ट्वीट प्रतीकने केलं आहे. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, पीएम मोदी शहरात आहेत त्यामुळे तुझ्यासोबत असे घडले असावे असे म्हटले आहे. यावर, अरेरे, मला माहित नव्हतं, असं प्रतीक गांधी म्हणाला. प्रतीक गांधीच्या ट्विटवर अनेक युजर्स त्याची फिरकी घेत आहेत.

- Advertisement -

एका यूजरने त्याच्या वेबसिरिजमधला डायलॉग हटके अंदाज लिहिल सांगितले की, हर बार रिस्क है तो इश्क है नही होता, मोटा भाई. त्यावर प्रतीक गांधी यांने रिप्लाय केला की, भाई, कोणतीही रिस्क नव्हती, फक्त मी माझ्या कामाला जात होतो.’ त्याचवेळी एका फॉलोअरने मुंबई पोलिसांचा ट्रॅफिक अॅडव्हायझरी प्रतीक गांधींसोबत शेअर केली आणि पोलिसांनी त्याबद्दल आधीच माहिती दिली होती असे सांगितले.

रविवारी मुंबईत पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारला. मुंबईतील माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी काल मुंबईत होते. त्यामुळे व्हीआयपी सुरक्षेच्या कारणास्तव वेस्टर्न एक्सप्रेस वेवरून धारावी, माटुंगादरम्यानची वाहतूक 3 – 9 च्या दरम्यान स्लो सुरु होती. यामुळे मुंबईकरांनी या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र या व्हीआयपी मुव्हमेंटची माहिती नसल्याने प्रतिकला या वाईट अनुभवाचा सामना करावा लागला.

हर्षद मेहतावर आधारित ‘स्कॅम 1992’ वेब सीरिजनंतर प्रतीक गांधी रातोरात स्टार बनले. प्रतीक गांधीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, लवकरच तो महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. यात प्रतीक ज्योतिराव फुले यांची तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरमयान ‘वो लड़की है कहाँ’ या चित्रपटातही तो अभिनेत्री तापसी पन्नूसोबत दिसणार आहे. त्याचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत.


ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांच्या आई सुषमा जोशी यांचे निधन, बॉलिवूडमधून शोक व्यक्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -