१० वर्षांपासून नागपूरमध्ये राहणार अफगाणी नागरिक झाला तालिबानी, फोटो झाला व्हायरल

१० वर्षांपासून नागपूरमध्ये राहणार अफगाणी नागरिक झाला तालिबानी, फोटो झाला व्हायरल

१० वर्षांपासून नागपूरमध्ये राहणार अफगाणी नागरिक झाला तालिबानी, फोटो झाला व्हायरल

अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा केल्यापासून अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याद्वारे अनेक दावे केले जात आहेत. अशाच प्रकारे सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे आणि याद्वारे फोटोतील व्यक्ती गेल्या १० वर्षांपासून नागपूरमध्ये राहत होता असा दावा करण्यात आला आहे. हा व्यक्ती मूळ अफगाणिस्तानचा असून त्याला भारतीय अधिकाऱ्यांनी काबुलला पाठवले आहे. हा व्यक्ती काबुलला जाताच तालिबान दहशतवाद्यांमध्ये सामील झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान नागपूर पोलिसांनी या वृत्ताला दुजारा देत सांगितले की, बेकायदेशीपणे नागपूरमध्ये राहणाऱ्या एका अफगाणी माणसाला काबुलला पाठवण्यात आले होते. पण व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणार व्यक्ती तोच आहे का नाही? याबाबत नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले नाही आहे.

पोलिसांच्या तक्रारीनुसार, १० वर्षांपासून फोटोमध्ये दिसणारा नूर मोहम्मद ऊर्फ अब्दुल हक नागपूरमध्ये राहत होता. नूर मोहम्मदला यावर्षी जूनमध्ये अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यात आले होते असे म्हटले जात आहे. भारतात राहताना १६ जून २०२१ रोजी नागपूर पोलिसांनी त्याला अटक केली होती. यावेळी पोलिसांना नूरच्या शरीरावर गोळ्याचे निशाण दिसले होते. तसेच त्याच्या जवळून तालिबानसंबंधित व्हिडिओ जप्त करण्यात आले होते.

नूर मोहम्मद दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये सामित असल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली होती. काही दिवसांच्या तपासानंतर नागपूर पोलिसांनी २३ जून २०२१ रोजी नूर मोहम्मदला अफगाणिस्तानला पाठवले. नागपूरमध्ये दिघोरी भागात भांड्याच्या दुकानात नूर राहत होता.

पोलिसांनी मिळलेल्या माहितीनुसार, त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. शेवटी त्याला २३ जूनला पकडले आणि अफगाणिस्तानला पाठवले. दोन महिन्यानंतर नूर मोहम्मद एलएमजी मशीन गनसोबत सोशल मीडियावर व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे. भारतातून अफगाणिस्तानमध्ये पाठवल्यानंतर तो तालिबानमध्ये सामिल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा – काबुल एअऱपोर्टवर १५० भारतीयांचे अपहरण ? तालिबान्यांनी फेटाळला दावा


 

First Published on: August 21, 2021 2:30 PM
Exit mobile version