उद्योग मंत्री उदय सामंतांची मध्यस्थी; रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांचा 15 सप्टेंबरचा संप मागे

उद्योग मंत्री उदय सामंतांची मध्यस्थी; रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांचा 15 सप्टेंबरचा संप मागे

रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी 15 सप्टेंबरचा संप मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांना संप न करण्याचे आवाहन केले. या आवाहना रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देत संप मागे घेतला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. (After Meeting With Uday Samant Mumbai Taxi Union Postpone Indefinite Strike Of September 15)

मुंबई टॅक्सीमेन यूनियन संघटनेशी उदय सानंत यांनी चर्चा केली. आजच्या झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी “तुम्ही संप करू नका याचा त्रास नागरिकांना होऊ शकतो”, अशी विनंती केली. दरम्यान, टॅक्सी चालकांच्या मागण्यांवर 4 दिवसांनी पुन्हा एकदा बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. टॅक्सी आणि रिक्षा दरवाढीसंदर्भात 10 दिवसांचा वेळ मागितल्याचे सामंत यांनी सांगतिलं. टॅक्सी चालक संघटनांकडून देखील राज्य सरकारला 10 दिवसांचा वेळ देत 15 सप्टेंबरचा बेमुदत संप लांबणीवर टाकण्यात आला आहे.

याबाबत मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेने माहिती देण्यात आली असून, निर्णय न झाल्यास पुन्हा संपाचा निर्णय घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच,

दरम्यान, “उदय सामंत यांच्या आवाहनानंतर संप 10 दिवस मागे घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही सरकारला 10 दिवसांचा वेळ देत आहोत. मात्र, त्या 10 दिवसांमध्ये निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा संपाचा निर्णय घेऊ”, असे मुंबई टॅक्सीमेन्स संघटनेने म्हटले.


हेही वाचा – भारतासाठी हेरगिरी? पाकिस्तानात तुरुंगवास भोगल्याचा दावा करणाऱ्याला 10 लाख द्या, सुप्रीम कोर्टाचा आदेश

First Published on: September 13, 2022 10:02 PM
Exit mobile version