शिवतीर्थावरील ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये अज्ञातांनी फाडले भाजपचे बॅनर्स

शिवतीर्थावरील ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर दादरमध्ये अज्ञातांनी फाडले भाजपचे बॅनर्स

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यानंतर अज्ञातांकडून भाजपाचे पोस्टर फाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर दादर परिसरातील भाजपाचे बॅनर फाडण्यात आले. पोस्टर्स कुणी फाडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करत असल्याचे समजते. (after uddhav thackeray dasara melava bjp banners tore by unidentified people at dadar)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे पोस्टर फाडण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी ठाकरेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, त्या शिवाजी पार्कपासून काही अंतरावरच लावण्यत आलेले भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले.

उद्धव ठाकरे समर्थकांनी हे पोस्टर्स फाडले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे आणि वांद्रे बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. या दोन्ही मेळाव्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप आणि शिंदे गटावर बोचरी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर दिलं.

दरम्यान, दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरिही शिवाजी पार्कवरील ठाकरेंच्या शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मात्र दादर परिसरात भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले.


हेही वाचा – भारतीय कफ सिरपमुळे गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू; डब्ल्यूएचओकडून चौकशी सुरू

First Published on: October 6, 2022 12:20 PM
Exit mobile version