घरताज्या घडामोडीभारतीय कफ सिरपमुळे गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू; डब्ल्यूएचओकडून चौकशी सुरू

भारतीय कफ सिरपमुळे गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू; डब्ल्यूएचओकडून चौकशी सुरू

Subscribe

पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे.

पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या 4 कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. सध्या डब्लूएचओकडून कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

डब्ल्यूएचओने या कफ सिरपवरून इशारा दिला असून, हे सर्दी-खोकल्यावरचे सिरप गॅम्बियामध्ये 66 बालकांचा मृत्यू आणि गंभीर समस्यांसाठी जबाबदार असू शकतात, असे कफ सिरपबाबत म्हटले आहे.

- Advertisement -

“प्रयोगशाळेच्या चाचण्यांदरम्यान मेडेन फार्मास्युटिकल्सच्या चार खोकला आणि सर्दी सिरपमध्ये अति प्रमाणात डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळून आले आहे. जे माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत”, असे डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कफ सिरप हरियाणातील एका कंपनीत तयार केले जात आहे. या सिरपच्या सेवनाने गॅम्बियामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

प्रोमेथाझिन ओरल सोल्युशन, कोफॅक्समॅलिन बेबी कफ सिरप, मॅकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरप अशी या चार सिरपची नावं आहेत. हे सर्व सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केले आहेत.


हेही वाचा – डीआरडीओकडून पुण्यात मानवविरहीत बोटीची यशस्वी चाचणी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -