कर्जत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

कर्जत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

प्रातिनिधिक फोटो

अहमदनगरमधील कर्जत शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अतिक्रमणावर कारवाई करा असा इशारा देत एका व्यक्तीने स्वत:ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतले. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ काढा अन्यथा आत्मदहन करु असा इशारा कर्जत येखील तौसीफ हमीम शेख या व्यक्तीने दिला होता. इशारा देऊनही प्रशासनाने काहीच दखल न घेतल्यामुळे तौसीफ यांनी आज स्वत:च्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतले. दरम्यान त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आग विझवली. यामध्ये तौसीफ ८० टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेतल्यानंतर सरकारी यंत्रणेचा भांडाफोड झाली आहे.

आश्वासन देऊनही कारवाई नाही

मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याने ११ जुलै २०१८ रोजी आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी तौसीफ हमीम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते. त्यावेळीही पोलीस बंदोबस्तात बांधकाम काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

आत्मदहनाचा दिला होता इशारा

दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर येऊन त्याने अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. या आगीत ते ८० टक्के भाजले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अॅम्ब्युलन्स बोलावून तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आले. पोलीस बंदोबस्त असतानाही सय्यद याने पेटवून घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच खळबळ उडाली. याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

First Published on: December 20, 2018 9:08 PM
Exit mobile version