अहमदनगर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यावर लाठीचार्ज

अहमदनगर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यावर लाठीचार्ज

पोलिसांनी जमावावर केला लाठीचार्ज

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना मत मोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या जमावावर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला आहे. मतदान केंद्राकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे ऐकले नाही तसंच त्यांच्यावर गुलाल फेकल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

अन पोलिसांनी केला लाठीचार्ज

मत मोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवार जिंकला की, कार्यकर्ते गुलालाची उधळण करत जल्लोष करत होते. दरम्यान, एक उमेदवार विजयी झाल्याचे कळताच त्याच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उडवला. तो गुलाल पोलिसांच्या अंगावर पडला. पोलिसांनी या जमावाला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणी एकत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. लाठीचार्ज होताच जमावाने मिळेल त्या दिशेने धूम ठोकली.

मतमोजणी केंद्राबाहेर चप्पलांचा खच

लाठीचार्ज होत असल्याने जमाव इकडे तिकडे पळत होता. त्यावेळी रस्त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या दुचाकी रस्त्यावर पडल्या. यामध्ये काही गाड्यांचे नुकसान झाले. तर या लाठीमारात काहीजण जखमी झाले. पळत असताना काही कार्यकर्त्यांच्या चप्पला पडल्या त्यामुळे मत मोजणी केंद्राबाहेर चप्पलांचा खच पडला होता.

हेही वाचा – 

Live Result अहमदनगर महापालिका: शिवसेनेला २२ जागा

First Published on: December 10, 2018 6:24 PM
Exit mobile version