मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नयेत, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी – अजित पवार

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नयेत, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार पूरग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्त गावाना भेटी दिल्या. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, त्याचबरोबर सरकारने पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरग्रस्त भागाची पाहणी करावी असा टोलाही एकनाथ शिंदे यांना लावला आहे.

ओला दुष्काल जाहीर करा –

राज्यात दहा लाख हेक्टर जमीनी पूरामुळे बाधित झाली असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे लवकरात लवकर करून मदत जाहीर करावी. त्याचबरोबर तातडीने अधिवेशन घेण्याची गरज राज्याला आहे, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

शेतकऱ्यांना पाऊन लाख हेक्टरी मदत करा –

पावसामुळे 10 लाख हेक्टर क्षेत्र बादीत झाले आहे. गडचीरोलीत जिल्ह्यात 25 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. विशेषता आहेरी, शिरोंचा, भामरागड या तालुक्यातील जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. ज्या शेतऱ्यांचा संपूर्ण प्रपंच धानावर अवलंबून होता त्या शेतकऱ्यांना जगण्यासाठी पाऊन लाख हेक्टरी प्रमाने दिले पाहीजेत. एसडीआरफचे नियम बाजूला ठेऊन या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहीजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भरीव मदत दिली पाहीजे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

First Published on: July 28, 2022 11:45 AM
Exit mobile version