मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे कोकणात जाणारे वैतागलेत : अजित पवार

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे कोकणात जाणारे वैतागलेत : अजित पवार

संग्रहित छायाचित्र

रायगडः मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. किती तरी टर्म झाल्या. मात्र या रस्त्याचे काम पुढे सरकत नाही. या मार्गावरुन जाणारे वैतागले आहेत. त्यांना असह्य वेदना होतात. त्यामुळे या महामार्गासाठी सुनील तटकरे यांनी प्रयत्न करावेत, असे मत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी व्यक्त केले.

सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, कोकणात अनेक दिग्गज नेते जन्माला आहेत. चांगले, अभ्यासू व विद्वान नेते कोकणाने दिले आहेत. मधू दंडवते यांनी कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केले. राष्ट्रीवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही मोलाचे योगदान आहे. मात्र मधू दंडवते यांचे नाव कोकण रेल्वेशी जोडले गेले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गासाठी तटकरे यांनी प्रयत्न करायला हवेत. कारण या मार्गावरुन जाणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. या मार्गावरुन जाणारे वैतागले आहेत. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

तटकरे यांनी कोकणाच्या विकासासाठी काम केले आहे. सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष म्हणून तटकरे यांचे नाव घेतले जाते. तटकरे यांची ३० वर्षांची यशस्वी राजकीय वाटचाल आहे. आघाडी सरकारच्या काळात तटकरे हे मंत्री होते. त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. कारण त्या निवडणुकीत सुनील तटकरे नावाचे नऊ उमेदवार होते. त्या उमेदवारांना दहा दहा हजार मते मिळाली. त्याचा फटका तटकरे यांना बसला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत तटकरे हे विजयी झाले. त्यांच्यावर कोकणवासियांनी भरभरुन प्रेम केले.

आज तटकरे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पक्षाची ध्येय, वाटचाल यात तटकरे यांचे योगदान असते. महाराष्ट्रात काम केल्यानंतर आज ते दिल्लीत काम करत आहेत. त्यांच्या कामाचा ठसा ते दिल्लीत उमटवत आहेत, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

 

First Published on: January 9, 2023 12:59 PM
Exit mobile version