ओल्या दुष्काळाचं पार वाटोळं झालं; शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अजित पवार संतापले

ओल्या दुष्काळाचं पार वाटोळं झालं; शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अजित पवार संतापले

Loksabha Election 2024: महायुतीत धुसफूस? 'हा' मतदार संघ यंदाही गाजणार

राज्यातील काही भागात पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं आहे. यातंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दोघांचाही हा पहिलाच एकत्रितरित्या दौरा असणार आहे. मात्र शिंदे-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले आहेत.

 

शिंदें-फडणवीसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अजित पवार काय म्हणाले ?

पाडवा आणि भाऊबीज निमित्त आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच शिंदे-फडणवीसांच्या राज्य दौऱ्यावर भाष्य करतांना अजित पवार म्हणाले की, “ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं वाटोळं झालं. ओला दुष्काळाच्या करता दिवाळीच्या आधी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना तेव्हाच मी म्हणत होतो की आता हाता बाहेर परिस्थिती गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या खरिपाची पिकं गेली आणि रब्बीची पिकं पण गेली. शेतकरी संकटात आहेत त्याला काय करावं, काय करू नये ते सुचत नाहीये. मात्र आज दिवाळीचा सण आहे पाडव्याचा सण आहे आज पण पॉलिटिकल काहीतरी बोलून पुन्हा त्याच्यामध्ये विरजण घालायचं काम मला करायचं नाही. उद्या याा मुद्यावर जे काही मला सांगायचं किंवा पक्षाच्या वतीने आमच्या लोकांना सांगायचं असेल तर मी भूमिका मांडेल” असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय.

अजित पवार काय म्हणाले पाहा विडिओ

https://fb.watch/goHlRx_P–/

________________________________________

हे ही वाचा – शिंदे-फडणवीस करणार महाराष्ट्र दौरा, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांवर निशाणा

First Published on: October 26, 2022 2:24 PM
Exit mobile version