घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस करणार महाराष्ट्र दौरा, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांवर निशाणा

शिंदे-फडणवीस करणार महाराष्ट्र दौरा, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांवर निशाणा

Subscribe

मुंबई – अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना तत्काळ नुकसान भरपाई जाहीर व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यातच, मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तारही रखडला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेनंतर या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच दौरा असणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांनी नुकतीच संभाजीनगरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी या शेतकऱ्यांच्या मागणीला ठाकरेंनी समर्थन दिलं आहे. आता, ठाकरेंनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या भागात शिंदे-फडणवीस दौरा करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसांत महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तसंच, लागलीच विधानपरिषदेच्याही निवडणुका लागणार आहेत. या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ठाकरे गटानेही महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रर पिंजून काढला आहे.

शिवसेनेला पुन्हा महाराष्ट्रात पाय रोवता यावेत याकरता शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. तर, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनीही महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन केलं आहे. एवढंच नव्हे तर या महाराष्ट्र दौऱ्यासाठी त्यांनी ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यांना टार्गेट केलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -