‘उगाच शिळ्या कढीला उत कशाला’?

‘उगाच शिळ्या कढीला उत कशाला’?

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधकांकडून नेहमीच वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक नेते भेटत आहेत. त्यामुळे घरवापसी चर्चेला उधाण आले आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, “जेव्हा कोणी येईल, घरवापसी होईल तेव्हा सांगेन, उगाच शिळ्या कढीला उत कशाला?”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

चर्चेला राष्ट्रवादीकडून दुजोरा

राजकीय पक्षात रंगलेल्या चर्चेला राष्ट्रवादीकडून दुजोरा देण्यात आला आहे. “शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान आणि माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रावादीत प्रवेश होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार” असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

पवारांच्या टीकेनंतर अजित पवारांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज्यपालांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल भेटू शकणार नाही, अशी माहिती मला मिळाली. मात्र, अशावेळी राज्यपालांनी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कारण कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे”.

पवारांनी केली राज्यपालांवर टीका म्हणाले…

केंद्र सरकारने शेतकऱ्यांविषयी घेतलेल्या अन्यायकारक भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. “राज्याच्या राज्यपालांनी शेतकऱ्यांना सामोरं यायला हवं होतं. पण, त्यांनी एवढी संवेदना दाखवली नाही. किमान त्यांनी राज्याच्या राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण, तेही त्यांनी केलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत. त्यांच्याविषयी मी अधिक काही बोलू इच्छित नाही, असं मत पवारांनी यावेळी व्यक्त केले.


हेही वाचा – शिवेंद्रराजे भोसले घरवापसी होणार? इतर आमदारांचाही लवकरच पक्षप्रवेश


 

First Published on: January 26, 2021 12:51 PM
Exit mobile version