BREAKING : NCP अध्यक्षपदात रस नाही, अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

BREAKING : NCP अध्यक्षपदात रस नाही, अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, पवारांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा काळ मागितला असला तरीही ते अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हट्ले जाते. परंतु शरद पवारांनी आपला निर्णय कायम ठेवला तर राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण? हा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी तीन ते चार प्रमुख नेत्यांची नावं समोर येत आली आहे. त्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दरम्यान, मला अध्यक्षपदाबाबत रस नाही, असा मोठा खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, मी अध्यक्ष बनण्याचा प्रश्नच येत नाही. मला अध्यक्षपदाबाबत रसच नाही, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करावे, अशी मागणी शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे. परंतु अध्यक्षपदाबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की, मी महाराष्ट्रात काम करतोय, माझी दिल्लीत ओळख नाही, आणि दुसऱ्या राज्याशी माझा संपर्क देखील नाही. यामुळे लोकसभेत किंवा राज्यसभेत काम करणाऱ्या व्यक्तीने अध्यक्षपद भूषवावे, अशी इच्छा जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार घोटाळेबाज, ताईंनाच अध्यक्ष करा – शालिनीताई पाटील 

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घाईनं घेतला. त्यांनी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष ठरवायचा असेल तर सुप्रिया सुळेंकडेच पद जावं. कारण सुप्रिया सुळे या पदासाठी सक्षम आहेत. अजित पवार हे गुन्ह्यांखाली अडकलेले घोटाळेबाज नेते आहेत. त्यांना राष्ट्रवादीचं अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला.


हेही वाचा : तुमच्या भावनांचा आदर करून १-२ दिवसांत निर्णय घेणार, शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी


 

First Published on: May 4, 2023 7:57 PM
Exit mobile version