त्रिसदस्यीय प्रभाग समितीला काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

त्रिसदस्यीय प्रभाग समितीला काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तीन प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना काही नेत्यांचा विरोध होता, संपूर्ण पक्षाचा विरोध नव्हता, असं म्हणाले. त्रिसदस्यीय प्रभाग समितीला काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विरोध होता, संपूर्ण पक्षाचा नाही, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कुठलाही विरोध नव्हता. वेगवेगळी मतं होती. तुम्ही त्याला पक्षाचं स्वरुप देऊ नका. कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं म्हणणं होतं की चारचा प्रभाग असावा, असं अजित पवार यांनी सांगितलं. प्रत्येकजण त्यांना जे योग्य वाटतं ती भूमिका तिथ मांडत असतात. शेवटी कॅबिनेट राज्यांच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली होत असते. सगळ्यांचं ऐकूण घेऊन, काहींनी दोन, काहींनी चार आणि काहींनी तीन सांगितलं. मग त्यात मध्य काढला काही की तीनचा प्रभाग ठेऊया. तो प्रस्ताव मंजूर करताना देखील चर्चा झाली. त्यानंतर तो अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सहीसाठी पाठवण्यात आला,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

सरकार चालवत असताना एक निर्णय झाल्यानंतर नेहमीच समाधानी रहायचं असतं. त्यावर वेगळी काहीतरी प्रतिक्रिया देऊन कारण नसतना गैरसमज पसरवायचे नसतात, असं माझं स्वत:चं मत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आपआपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. परंतु एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळे हा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा आहे, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा –केंद्राकडून मदत करताचा दुजाभाव लपून राहिलेला नाही; पूरग्रस्तांच्या मदतीवरुन अजित पवारांचं टीकास्त्र


 

First Published on: September 30, 2021 12:42 PM
Exit mobile version