काहीजण एवढी कागदपत्रे दाखवून घोटाळ्याचा आरोप करतात, अजितदादांचा सोमय्यांवर निशाणा

काहीजण एवढी कागदपत्रे दाखवून घोटाळ्याचा आरोप करतात, अजितदादांचा सोमय्यांवर निशाणा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी विक्रीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. जर कोणी घोटाळा केला असेल तर पुढे येईल जर कोणी घोटाळा केला नसेल तर तो देखील पुढे येईल. आरोप करणं विरोधी पक्षाचे काम असते. त्यापद्धतीने ते आरोप करत असतात पुरावा बघितला जाईल नुसत्या बिनबुडाच्या आरोपाला काही अर्थ नसतो, काही जण एवढी कागदपत्रे दाखवतात… अमुक तमुक… चौकशी करण्याचा अधिकार ज्या एजन्सीला आहे ती एजन्सी चौकशी करेल की नाही की दुसरं कुणी करेल असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता किरीट सोमय्या यांना लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला असल्याचा प्रश्न विचारला असता जर कुणी भ्रष्टाचार केला असेल तर तो पुढे येईल किंवा केलेला नसेल तर तेही पुढे येईल. आरोप करणं हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्याचपध्दतीने ते आरोप करत आहेत असे म्हटलं आहे.

त्यांनी केलेल्या आरोपात पुरावा बघितला जाईल. नुसता बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. याप्रकरणात अनेकांनी पूर्वीच्या सरकारमध्ये असताना चौकशी केलेली आहे. सीआयडी, एसीबी, एडब्लूओ यांनीही चौकशी केली आहे. सहकार विभागाने एका न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी केलीय. यामध्ये एक – दोन कारखाने चालवायला दिले किंवा विकले गेलेले नाहीत तर त्याचा जवळपास आकडा ६०-७० पर्यत असू शकतो आणि त्यात सर्वच राजकीय पक्षाशी संबंधित उद्योगपती, बिल्डर आहेत असेही अजित पवार म्हणाले.

सविस्तर पत्रकार परिषद घेणार

कारखान्याच्या खरेदी आणि विक्रीचा आकडा ७० कारखान्यांचा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच उभ्या उभ्या पत्रकार परिषद घेणार नसून सविस्तर माहिती देणार आहे. यामध्ये कोणाच्या राज्यात कोणी आणि किती कारखाने विकले, विकत घेतले याचा तपशील सांगणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

राजकिशोर मोदींच्या प्रवेशाने बीडमध्ये पक्ष बळकट होईल

बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

राजकिशोर मोदी यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


हेही वाचा : आधी शूर्पणखा म्हणून उल्लेख, आता मैत्रीचा धागा, रूपाली चाकणकरांच्या निवडीवर चित्रा वाघ म्हणतात…


 

First Published on: October 21, 2021 4:47 PM
Exit mobile version