निवडणुकांपूर्वी अजित पवार जेलमध्ये जाणार का? या प्रश्नावर दानवे यांची चुप्पी!

निवडणुकांपूर्वी अजित पवार जेलमध्ये जाणार का? या प्रश्नावर दानवे यांची चुप्पी!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडच्या जाहीर सभेत सिंचन घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे अजित पवार यांना अटक करणार असल्याचे म्हटले होते. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, असे विधान दानवे यांनी केले होते. मात्र, गुरुवारी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार हे निवडणुकांपूर्वी जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा दानवे यांनी शांत राहणेच पसंद केले. त्यामुळे त्यांनी याअगोदर केलेल्या विधानावर यूटर्न घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

दानवेंनी उत्तर देणे टाळले

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार जेलमध्ये जाताना दिसत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘जातील मी पिंपरी-चिंचवड मध्येच बोललो होतो, दुसऱ्या दिवशी कोर्टाने ताशेरे ओढले होते. सरकारला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिला आणि बंद पाकिटात सरकारने माहिती दिली होती’, असे उत्तर दानवे यांनी दिले होते. निवडणुकांच्या अगोदर अजित पवार जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न पुन्हा विचारला असता यावर दानवे यांनी उत्तर देणे टाळत शांत राहणे पसंद केले. त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या दुकानात मोठा शस्त्रसाठा सापडला, यावरही दानवे यांनी बोलणे टाळले.

डान्सबाद बंदच राहिले पाहिजेत – दानवे

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवल्यानंतर या निर्णयावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, या निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी ते म्हणाले की, ‘मी निर्णय वाचला नाही. परंतु, पक्ष्याचे आणि माझे वैक्तिक मत हे डान्सबार बंद असला पाहिजे असं आहे’. पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

First Published on: January 17, 2019 10:33 PM
Exit mobile version