विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लागणे दुर्देवी, MPSC निर्णयात कमी पडली – उपमुख्यंंत्री

विद्यार्थ्यांना आंदोलन करायला लागणे दुर्देवी, MPSC निर्णयात कमी पडली – उपमुख्यंंत्री

राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे ढकल्याने MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुणे, कोल्हापूर,नाशिक, नागपूरमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ आली हे दुर्दैवी आहे. MPSC परीक्षेबाबत निर्णय घेण्यात कमी पडली आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ येता कामा नये यासाठी सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे. २१ मार्चनंतरच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच घेण्यात येतील. एमपीएससी प्रकरणी राजकारण करणं योग्य नाही. राज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकल्यामुळे जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

एमपीएससीच्या परीक्षेत राजकारण आणायचे काही कारण नाही. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. यामध्ये काहींनी राजकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सरकारचा पाठींबा आहे परंतु दिशाभूल करण्याचा प्रयत्न काल झाला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीला सांगून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यास सुरु ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एमपीएससीने प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते परंतु एमपीएससी परीक्षेबाबत निर्णय घेण्यात कमी पडली असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अंति आहे आणि त्यांच्या निर्णयाला आमचे समर्थन आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे ते नको त्या मागण्या करतील असा टोला विरोधकांना लगावला आहे. एमपीएससीने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याचे नात्याने विद्यार्थ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

First Published on: March 12, 2021 1:35 PM
Exit mobile version