विकासकामांना स्थगिती नको, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विकासकामांना स्थगिती नको, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तत्कालीन आघाडी सरकारने सुरु केलेल्या विकास कामांना स्थगिती देऊ नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई तसेच मदतीचे तातडीने वितरण करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदनही यावेळी शिंदे आणि फडणवीस यांना दिले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती द्यायला सुरुवात केली आहे. खुद्द अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीमधील विकास कामांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज शिंदे आणि फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी आमदार छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते.

941 कोटीच्या विकास कामांन स्थगिती –

शिंदे-फडणवीस सरकारने काही तासापूर्वी नगरविकास खात्याने मंजूर केलेल्या 941 कोटी रुपयांच्या विकास कमांना स्थगिती दिली होती. यातील 245 कोटींची कामे बारामती नगर परिषदेची होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या विकास कामाला मान्यता देण्यात आली होती. मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीमध्ये यांना मंजुरी मिळाली होती. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवार यांच्या मतदार संघातील कामांना ब्रेक लागणार आहे. यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

First Published on: July 18, 2022 9:44 PM
Exit mobile version