अकोले पंचायत समिती सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू

अकोले पंचायत समिती सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू

दत्तात्रय बोऱ्हाडे यांचा अपघाती मृत्यू

अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे (५५) यांचे बुधवारी (दि.२०) नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये  उपचार सुरु असताना निधन झाले.
अकोले तालुक्यातील केळी ओतूर येथे राहत्या घरी विहिरीचे काम चालू असताना (दि. १७) ते विहिरीत पडले होते. त्यांना तातडीने नाशिक येथे शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्पात पत्नी, २ मुले, १ मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तातडीने नाशिकला धाव घेतली. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे. सातेवाडी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी बोऱ्हाडे यांचे निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
First Published on: May 20, 2020 2:00 PM
Exit mobile version