आळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची निर्घृण हत्या

आळंदीमध्ये भाजप नगरसेवकाची निर्घृण हत्या

भाजप नगरसेवक बालाजी कांबळे

आळंदीमध्ये भाजप नगरसेवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये आळंदीचे नगरसेवक बालाजी कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. ४ ते ५ जणांच्या टोळीने बालाजी कांबळे यांच्यावर कोयत्याने वार करुन हत्या केली. आळंदी-भोसरी रोडवर वडमुखवाडीजवळ ही घटना घडली आहे. या हत्येचे कारण अस्पष्ट आहे. बालाजी कांबळे यांच्या हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

अशी घडली घटना

आज दुपारी भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर काही अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. आळंदी-भोसरी रोडवर वडमुखवाडीजवळ दुपारी चार वाजता ही घटना घडली. चारचाकीमधून आलेल्या ४ ते ५ जण आले. त्यातल्या दोन अल्पवयीन आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. बालाजी कांबळे यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बालाजी कांबळे यांच्या हत्येचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दोन वर्षापूर्वी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची हत्या

१६ ऑक्टोबर २०१६ मध्ये तळेगाव दाभाडेचे भाजपाचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची देखील अशीच हत्या करण्यात आली होती. शेळके यांच्यावर भरदिवसा धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सचिन शेळके यांना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. शेळके यांच्या हत्येचा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला होता.

First Published on: June 26, 2018 6:29 PM
Exit mobile version