यंदा जिनिअस टेकफेस्टमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन रोबो

यंदा जिनिअस टेकफेस्टमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन रोबो

सापेक्षवादाचा सिद्धांत सांगणारा वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन तुमच्याशी समोर बसून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असेल तर हा अनुभव कसा असेल? दहा लाख चेहरे ओळखणारा अल्बर्ट आइन्स्टाईन पाहिला तर तुम्ही अवाक व्हाल. तुमच्या चेहर्‍याचे हावभाव ओळखणारा, समजून घेणारा असा हा अल्बर्ट आइन्स्टाईन रोबो भारतीयांच्या भेटीला येतोय. आयआयटी टेकफेस्टमध्ये त्याला भेटण्याची संधी मिळणार आहे. येत्या ३ ते ५ जानेवारी दरम्यान हे टेकफेस्ट होणार आहे.

भारतात अल्बर्ट आइन्स्टाईन या रोबोची पहिलीच भेट आहे. जिनिअस असा रोबोचा नावलौकिक आहे तो त्याच्या गुणांमुळे. प्रेक्षकांमधील कोणत्याही व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याची क्षमता या रोबोमध्ये आहे. हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्सने फेशिअल रेकगनिशन सॉफ्टव्हेअऱचा वापर करून हा रोबो तयार केला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीचे वय आणि लिंग सांगण्याची क्षमताही या रोबोमध्ये आहे. या रोबोला भारतात आणण्याचे कारण इथे विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे आहे.

मानवी मनाच्या भावना जाणण्याचा गुणदेखील या रोबोमध्ये आहे. आपल्या मनातील राग, भीती, आनंद, दुःख यासारख्या भावनाही हा रोबो ओळखतो. सॉफ्टव्हेअरमुळे चेहर्‍यावरील अनेक गोष्टींची नोंद घेत हा रोबो तात्काळ प्रतिक्रिया देतो. त्यात चेहरा पाहून वय आणि लिंग सांगण्याचे फीचरही आहे. प्रश्नांना तात्काळ उत्तरे देण्याचे वैशिष्ठ्यही या रोबोमध्ये आहे.

First Published on: December 29, 2019 6:58 AM
Exit mobile version