Mumbai-Sindhudurg flight : मुंबई- सिंधुदुर्ग विमान प्रवास फक्त २५०० रुपयांत, वाचा फ्लाईटचे वेळापत्रक

Mumbai-Sindhudurg flight : मुंबई- सिंधुदुर्ग विमान प्रवास फक्त २५०० रुपयांत, वाचा फ्लाईटचे वेळापत्रक

Mumbai-Sindhudurg flight : मुंबई- सिंधुदुर्ग विमान प्रवास फक्त २५०० रुपयांत, वाचा फ्लाईटचे वेळापत्रक

वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, आणि गच्च भरलेल्या कोकण रेल्वे प्रवासाने बेजार झालेल्या कोकणवासियांना आता थेट विमानाने सुखद प्रवास करता येणार आहे. कारण सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबरला विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ९  ऑक्टोबर विमानतळाचा उद्धाटन  सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे हे विमानतळ ९ ऑक्टोबरपासूनच कोकणवासियांच्या सेवात दाखल होणार आहे. मुंबई – सिंधुदुर्ग विमान असा हा प्रवास फक्त २५०० रूपयांत करता येणार आहे. हे विमान १ तास २५ मिनिटांत मुंबईहून सिंधुदुर्गला पोहोचेल. (The Mumbai-Sindhudurg flight will start from October 9) या चिपी विमानतळाचे उद्घाटन रोजी होणार आहे.

रस्तेमार्गे हा प्रवास करायचा झाल्यास ९ ते १० तासांचा कालावधी लागतो. मात्र या नव्या विमान सेवेमुळे कोकणवासियांना हे अंतर अवघ्या १ तास २५ मिनिटांत गाठता येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव, होळी अशा सणांसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

एअर इंडियाची (Alliance Air flying) ‘अलायन्स एअर’ ही कंपनी ९ ऑक्टोबरपासून मुंबई – सिंधुदुर्ग मार्गावर नियमित विमानफेरी सुरू करणार आहे. यासाठी एअर अलायन्सने मुंबई-चिपी आणि चिपी-मुंबई हा अनुक्रमे ७४ आणि ७५ वा मार्ग खुला करणार असल्याचे सांगितले आहे. या मार्गावर दररोज थेट हवाई सेवा सुरू होईल.

फ्लाईटचे वेळापत्रक

१) मुंबई-चिपी-मुंबई प्रवासाकरिता ‘एटीआर-७२ ६००’ हे विमान तैनात केले जाणार असून त्याची आसन क्षमता ७० इतकी आहे.

२) ‘९आय- ६६१’ क्रमांकाचे विमान दररोज सकाळी ११.३५ वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण घेईल आणि दुपारी १ वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल.

३) तर ‘९आय- ६६२’ क्रमांकाचे विमान चिपीहून दुपारी १.२५ ला निघून २.५० ला मुंबईत दाखल होईल.

फ्लाईटचे तिकिट

१) मुंबई ते सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी २ हजार ५२९ रूपये असे भाडे असेल.

२) सिंधुदुर्ग ते मुंबई फेरीसाठी २ हजार ६२१ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

मुंबई विमानतळावरून घेणार उड्डाण

१) मुंबई-सिंधुदुर्ग या विमान मार्गासाठी मुंबई विमानतळाने एक स्लॉट उपलब्ध करून दिला आहे.

२) सध्या टर्मिनल २ वरून मुंबई-सिंधुदुर्ग विमानाचे उड्डाण होईल. मात्र, टर्मिनल १ खुले केल्यानंतर तेथून नियमित विमान उड्डाण सुरु होईल.

३) त्याशिवाय हैदराबाद-सिंधुदुर्ग-हैदराबाद मार्गावरही विमानफेरी चालविण्याचे विचार सुरु आहे.

देशातील हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येत आहे.


PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिकेतील ज्वाइंट बेस एंड्रयूजमध्ये दाखल, भारतीयांकडून जंगी स्वागत


 

First Published on: September 23, 2021 10:50 AM
Exit mobile version