आंबेनळी अपघात : मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

आंबेनळी अपघात : मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

आंबेनळी अपघात : मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये मोठा बस अपघात झाला होता. या अपघातामध्ये ३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेमध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकमेव व्यक्ती वाचली होती. त्यानंतर या अपघाताप्रकरणी प्रकाश सावंत यांच्यावर संशय वक्त केला जात होता. मात्र ५ महिन्यानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. मृत बस चालक प्रशांत भांबीड यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

नेमके काय घडले होते?

बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २९ जुलै रोजी विकेंडसाठी बसने महाबळेश्वर सहलीसाठी निघाले होते. पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावालगतच्या आंबेनळी घाटात ही बस ३०० फूट दरीत कोसळून ३२ प्रवासी दगावले आणि एकजण वाचले होते. काही क्षणांतच काळाने घाला घालून विकेंडचा शनिवारीच दी एण्ड केला. पोलादपूरला ९.३० वाजता ३३ जणांनी फोटो काढून सहलीच्या आनंदाची झलक दाखवली. त्यानंतर १०.३० वाजता भीषण अपघात झाला. काही वर्षांपूर्वी झी नेटवर्कचे झैदी यांची कारही याच ठिकाणाहून दरीत कोसळून ७ जण मृत्यूमुखी पडले होते. याच ठिकाणी संरक्षक कठडा उभारण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, पोलादपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल कधीच घेतली नाही.

‘त्या’ चार तासांत काय घडलं ?

First Published on: January 5, 2019 11:17 AM
Exit mobile version