छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली – अमित शहा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली – अमित शहा

जेव्हा संपूर्ण देशात अंधारयुग होतं. तेव्हा आशेचा किरण सुद्धा जवळपास दिसत नव्हता. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणंही कठिण होतं. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचलं. त्यांच्या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचं सौभाग्य मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त लढाईच केली नाही. तर अनेक तरूणांचं नेतृत्व केलं. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तसेच शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हा अमित शहा म्हणाले की देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या मार्गावर प्राणांची आहूती देण्यासाठी प्रेरित केलं. अनेक लढाईंमध्ये त्यांनी विजय-पराभव प्राप्त करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. न्याय, समाज कल्याण आणि आत्मरक्षणासाठी नौदल बनवण्याचं काम शिवाजी महारांजांनी केलं आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती सर्व तरूणांसाठी प्रेरणास्थान आहे.

संविधानाला स्वरूप देण्यासाठी बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वातंत्र्यानंतर संविधान बनिवण्यात मोठं योगदान राहिलं आहे. संविधानाला स्वरूप देण्यासाठी खूप मोठं योगदान राहिलं आहे. ते ड्राफ्टिंग कमिटिचे चेअरमन होते. सर्व वादग्रस्त मुद्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आहे. देशातील दलित आणि मागासवर्गीय लोकांसाठी त्यांनी संविधानाला बौद्ध करण्याचं काम त्यांनी केलं आहे. असं अमित शहा म्हणाले.

संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान, यातना आणि कटुता सहन केलं. मात्र, संविधान निर्मिती करताना त्यांनी कधीच कटुता येऊ दिली नाही. सर्व समाजाला त्यांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपलं संविधान आहे. बाबासाहेबांनी तयार केलेलं संविधान संपूर्ण जगभरात सर्वश्रेष्ठ आहे.

पुण्याला लवकरच मेट्रो मिळणार

पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक काम केली आहेत. मेट्रोच्या कामाला हिरवा कंदील दाखवला असून पुण्याला लवकरच मेट्रो मिळणार आहे. तसेच स्मार्ट सिटीसाठी १०० कोटी त्यांनी दिले आहेत. पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. असं शहा यांनी सांगितलं.


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत दोन-तीन आठवड्यांचा होऊ शकतो विलंब, जाणून घ्या कारण?


 

First Published on: December 19, 2021 6:45 PM
Exit mobile version