अमोल मिटकरींचं तीन शब्दांत ट्वीट, विरोधकांना दिलं उत्तर

अमोल मिटकरींचं तीन शब्दांत ट्वीट, विरोधकांना दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या भाषणामधील वक्तव्यांवरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. मात्र, अमोल मिटकरी यांनी या वादावर तीन शब्दांचं ट्वीट केलं आहे. यामधून त्यांनी विरोधकांना आणि टिकाकरांना उत्तर दिलं आहे.

काय आहे अमोल मिटकरींचं ट्विट ?

अमोल मिटकरी यांनी वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll…असं ट्वीट करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. यामधून त्यांनी मौन बाळगणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.

मिटकरींनी केलेल्या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

मी कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही

माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाहीये. मी कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आंदोलनाविरोधात दिलंय.

कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये, असं मिटकरी म्हणाले.


हेही वाचा : अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन


 

First Published on: April 22, 2022 2:46 PM
Exit mobile version