धक्कादायक! उपचार म्हणून ३ वर्षाच्या चिमुकल्याला दिले गरम चटके

धक्कादायक! उपचार म्हणून ३ वर्षाच्या चिमुकल्याला दिले गरम चटके

प्रातिनिधीक फोटो

३ वर्षांच्या चिमुकल्याला आजारातून बरं करण्यासाठी मुलाच्या पोटावर गरम चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. चिमुकल्याला पोटावर गरम चटके दिल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हा भयंकर प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील लवादा येथील ही घटना आहे. दोन दिवसांपासून या चिमुकल्या मुलाचे पोट फुगले होते. या मुलाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल न करता त्यावर उपचार म्हणून पोटवर गरम सळीचे चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या गंभीर जखमी असलेल्या मुलावर सामाान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंधश्रद्धेमुळे चिमुकल्याचा जीव धोक्यात

मुलाला आजारातून बरं करण्यासाठी गरम चटके दिल्याने त्याच्या पोटावर जखमा झाल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आता या मुलाच्या प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेळघाटातील लहान मुलांना वारंवार पोटफुगी या आजाराचा सामना करावा लागत आहे. यावर डॉक्टरकडे जाण्याऐवजी अनेक ठिकाणी आदिवासी पाड्यावर उपचार म्हणून गरम सळीचे चटके मुलांच्या पोटावर दिल्याचा अनेक घटना या आधीही समोर आल्याचे समजते.


उरी सेक्टरमध्ये LOC च्या बाजूने संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यात कैद; लष्कराची माहिती
First Published on: September 1, 2020 3:49 PM
Exit mobile version