PM Narendra Modi : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत पण…, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भावना

PM Narendra Modi : उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत पण…, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भावना

उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही पण..., पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भावना

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही, असे विधान करत त्यांच्याविषयी असलेली मनातील भावना व्यक्त केली. निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पण आजही पंतप्रधान मोदींच्या मनात बाळासाहेबांचा मुलगा म्हणून ते उद्धव ठाकरेंचा आदर करतात, असे त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi expressed his feelings about Uddhav Thackeray)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षफुटीसारखा भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे भाजपासमोर महाराष्ट्रात भावनिक मुद्दा मोठे आव्हान आहे असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यावेळी जो भावनिक मुद्दा आहे, तो भाजपाच्या, महायुतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमच्यासोबत आहेत. खरी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे.

हेही वाचा… Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर?

तर, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे हे बायोलॉजिकली बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. तो माझा विषयच नाही. ते आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनींनी (रश्मी ठाकरे) रोज फोन करून विचारायचो. ऑपरेशन पूर्वी त्यांनी मला फोन केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की, तुम्ही काय सल्ला द्याल? तेव्हा मी म्हटले की तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. उद्या संकट आले तरी त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून. पण बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगेल, असे भावनिक विधान पंतप्रधान मोदी यांनी केले.

ही बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली…

तसेच, बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होते. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. कर्ज विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत आमनेसामने लढलो होतो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांबद्दल एक शब्दही बोललो नव्हतो. मी जाहीरपणे म्हणाालो होतो की, मला उद्धव ठाकरेंनी कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक समस्या काय आहेत, तो माझा विषय नाही. पण मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करतो. आणि आयुष्यभर मी त्यांचा आदर करत राहीन, असेही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत जाहीरपणे सांगितले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : राज्यातील 15 पैकी 13 जागांवर शिंदे – ठाकरे अशी थेट लढत; जनतेचा कौल कोणाला?


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 2, 2024 9:56 PM
Exit mobile version