Amravati Violence: भाजप नेते अनिल बोंडे यांना जामीन मंजूर

Amravati Violence: भाजप नेते अनिल बोंडे यांना जामीन मंजूर

अमरावती दंगली प्रकरणी अटक करण्यात आलेल्या भाजप नेत्यांचा जामीन कोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये भाजप नेते अनिल बोंडे यांचा देखील समावेश आहे. आज सकाळी बोंडे यांच्यावर अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांच्यावर दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे या कलमांतर्गत बोंडेवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण काही तासांत याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनिल बोंडेसह १४ जणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आज, सोमवारी सकाळी अमरावतीमधील दंगल भडकवल्याच्या प्रकरणी अनिल बोंडेसह अनेक भाजप नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीशिवाय सुनावणी घेता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यानंतर बोंडेसह भाजप नेत्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मग कोर्टाने सुनावणी सुरू केली. कोर्टाने अनिल बोंडेसह भाजप नेत्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १४ जणांना याप्रकरणात अटक करण्यात आली होती. काल, रविवारी दोघांना आणि उर्वरित १२ जणांना आज अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अमरावतीचे भाजप नेते, महापौर, माजी पालकमंत्री, भाजप प्रवक्ते, नगरसेवक इत्यादींचा समावेश आहे. आज दुपारी अडीच, पावणे तीनच्या सर्वांना सुमारास कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. वैद्यकीय चाचणी वैगरे झाल्यानंतर आम्ही अर्ज दाखल केला. तसेच सरकारी वकीलांनी आपला प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर विद्यमान न्यायमूर्तींनी सर्वांना जामीनावर सोडले.


हेही वाचा – Amravati Violence: शरद पवारांच्या आशीर्वादाने होतायत दंगली – अनिल बोंडे


 

First Published on: November 15, 2021 7:35 PM
Exit mobile version