मी कोणाच्या बापाला घाबरत नाही- अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला सुनावले

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही- अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला सुनावले

महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना बऱ्याचवेळा ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. याचपार्श्वभूमीवर त्यांनी ट्रोलर्सला सुनावले असून तुम्ही ट्रोल करत राहा. पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असे त्यांनी ट्रोलर्सला ठणकावून सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे दोघे एका वृतवाहीनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी अमृता यांना त्यांच्या विरोधकांवरील टि्वटस आणि ट्रोलर्सवर प्रश्न विचारण्यात ाला. त्यावेळी त्यांनी ट्रोलिंगमुळे स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी स्वत:चे विचार व्यक्त करत राहीन, तुम्ही ट्रोल करत रहा,’ असं आव्हान देत मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, अशा शब्दांत ट्रोलर्सना सुनावले.

तसेच यावेळी अमृता यांना बऱ्याचवेळा काही टि्वटस डिलिट करावे लागत असल्या बदद्ल विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्रजींच्या सांगण्यावरून ट्विट डिलिट केल्याचं अमृता यांनी सांगितले. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमृता यांची पाठराखण करत तिची स्वतंत्र मत असल्याचं सांगितलं. तसेच अमृता यांना ट्रोल केल्यावर वाईट वाटत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ट्रोलर्स दोघांचा उल्लेख मामू आणि मामी करत असल्याचे विचारल्यावर आम्हांला याची मजा वाटत असल्याचे अमृता म्हणाल्या. यावेळी दोघांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यावरही भाष्य केलं.

First Published on: May 1, 2022 5:23 PM
Exit mobile version